Uddhav Thackeray Latest Speech : आताचं सरकार हे काम'गार' करणारं सरकार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आताचं सरकार हे काम'गार' करणारं सरकार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Latest Speech
Uddhav Thackeray Latest SpeechSaam TV
Published On

Uddhav Thackeray Latest Speech : 'आताचं जे सरकार आहे, ते दिल्लीच असेल आणि दुर्दैवाने महाराष्ट्राचं आहे. हे महाराष्ट्राचं काम..गार करणारं सरकार आहे', असं केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray Latest Speech : 'कामगार सेनेला 55 वर्ष झाली आणि शिवसेनेला 56 वर्ष'

कामगार सेनेला 55 वर्ष झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''बऱ्याच दिवसानंतर कामगार सेनेचा हा कार्यक्रम होतोय. कामगार सेनेला 55 वर्ष झाली आणि शिवसेनेला 56 वर्ष झाली, तरीही कामगार सेना तरुण वाटतेय. दत्ताजी साळवींसारखी निष्ठावंत लोक काही घेण्यासाठी आलीच नव्हती, देण्यासाठी आली होती. मुलुखमैदानी तोफ कशाला म्हणतात हे दत्ताजींची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनाच समजु शकेल.'' (Latest Political News)

Uddhav Thackeray Latest Speech
Nitesh Rane on Uddhav Thackeray: ...तर उद्धव ठाकरे यांचे कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही: नितेश राणे

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत म्हणाले की, ''अडीच वर्षात आपण 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो, काही आणली. त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवून नेले. तरी क्षणात बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार?'' (Maharashtra Politics)

Uddhav Thackeray Latest Speech : 'शिवसेनेचा जन्म भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी झाला'

ते म्हणाले, ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी झाला, त्या भूमिपुत्रांवर अन्याय करुन येऊ घातलेले उद्योगधंदे बाजूला स्वत:च्या राज्यात नेत आहेत. तरी ते शांत आहेत! हे कसले बाळासाहेबांचे विचार?, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे.

Uddhav Thackeray Latest Speech
Sanjay Raut News : शरद पवारांच्या भाकरी फिरवण्याच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray Latest Speech : '2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून बाहेत गेली'

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''येताना माहिती मिळाली की, सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमआययू केला होता. 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com