Grant Road News  Saam TV
मुंबई/पुणे

Misbehaving with Girl in Train: धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकावरील घटना

Mumbai Crime News : शुक्रवारी पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीला लक्ष्य केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai Train News : मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रँडरोड स्थानकावर धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ जून रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी आता मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीला लक्ष्य केले. त्यानंतर आरोपी धीम्या गतीने धावणाऱ्या ट्रेनमधून उडी मारून पसार झाला.

घाबरलेल्या पीडित तरुणीने त्याच दिवशी पोलिसांकडे धाव न घेता घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 5 दिवसांनी बुधवारी तिने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोपींनीही तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीचा शोध सुरु केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी चर्नी रोड स्टेशनवर ट्रेनमध्ये चढली होती. लोकल ट्रेन ग्रँट रोड स्थानकावर पोहोचताच एक तरुण ट्रेनमध्ये चढला आणि तरुणीशी गैरवर्तन करु लागला. (Crime NEws )

तरुणाने अश्लील हावभाव करत तरुणीशी असभ्य भाषेत संवाद साधला. तरुणीने आरडाओरड करताच आरोपीने काढला पळ तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वीज पुरवठा खंडित झाल्याने नगरसेवकांंचे झोपून ठिय्या आंदोलन

Nashik : मोठी बातमी! TCSचे ऑफिस बंद, सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

Income Tax New Rule: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल

BJP CM: भारतात भाजपचे किती मुख्यमंत्री? एका क्लिकवर वाचा यादी

Chanakya Niti: स्वतःला परफेक्ट बनवण्यासाठी फॉलो करा या 5 सवयी; 7 दिवसात बदलेल आयुष्य

SCROLL FOR NEXT