Mumbai Hoax Call News Update : मागील काही दिवसांपासून मुंबई उडवून देण्याच्या धमक्या वारंवार येत आहेत. अशाच प्रकारे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबई उडवून देण्याची पुन्हा धमकी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा कॉल करणाऱ्याला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली. नासिमूल हसन रफी उल हसन शेख असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)
मुंबईजवळील (Mumbai News) मीरा रोड पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबईत दोन दहशतवादी घुसल्याचे सांगून त्यांचे फोन नंबर दिले.
या फोननंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावरून शोध घेतला असता त्यातील एक क्रमांक दहिसरचा असल्याचे समोर आले. याची माहिती मीरा भाईंदर पोलिसांनी मुंबई नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी तात्काळ दहिसर व गुन्हे शाखेच्या पोलिसांना या व्यक्तींचा शोध घेण्यास सांगितले.
पोलिसांनी दोघांपैकी एकाचा शोध घेतला असता, ती महिला असल्याचे उघड झाले. अधिक तपास केला असता ती महिला वेश्याव्यवसाय करत असून, ग्राहकासोबत झालेल्या वादातून कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे तिने सांगितले. आरोपीच्या या एका फोनमुळे मीरा-भाईंदर व मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.