Mumbai Crime News : 'ती' हौस पडली महागात; सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला लाखोंचा गंडा

Mumbai News : एका अनोळख्या तरुणीने मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून तरुणाला प्रथम न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले होते.
Juhu Police Station
Juhu Police StationSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या जुहू परिसरातील एका 39 वर्षीय व्यक्तीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून तब्बल 1.4 लाखांची खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. एका अनोळख्या तरुणीने मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून तरुणाला प्रथम न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार दिली आहे.

तरुणाच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 जून व 18 जून या कालावधीत घडला आहे. तक्रारदारांना तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर संपर्क साधण्यात आला होता. या तरुणीने त्यांच्याशी चॅटिंग केले व व्हिडीओ कॉल करण्यासाठी तरुणाचा व्हाट्सअप नंबर घेतला.

तरुणीने समोरून व्हिडिओ कॉल केला त्यावेळी तरुणीने स्वतःचे कपडे उतरवलेले होते व तरुणाला कपडे उतरवण्यास सांगितले, त्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग करून घेतले. हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. म्हणून त्या तरुणाने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून त्या तरुणीचा मोबाईल नंबर देखील ब्लॉक केला. (Latest sports updates)

Juhu Police Station
WC 2023, Ind vs Pak Match : भारत-पाकिस्तान सामना भारतात व्हावा हे अजिबात पटणारं नाही; मनसेचा विरोध BCCIचं टेन्शन वाढवणार

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अनोळख्या नंबरवरून तरुणाला पुन्हा कॉल आला व त्याने आपण दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत असून तुमचे न्यूड व्हिडीओ सगळीकडे वायरल होत आहेत. ते डिलीट करण्यासाठी तुम्ही यूट्युबशी बोलून घ्या, असे सांगत Youtube चा नंबर दिला. (Crime News)

Juhu Police Station
Pune Sadashiv Peth News: सदाशिव पेठ महाविद्यालयीन तरुणी हल्ला प्रकरण; पोलीस हवालदारासह तिघेजण निलंबित

तरुणाने तिथे फोन केला असता त्याच्याकडून व्हिडीओ डिलीट करण्याच्या नावाखाली तब्बल एक लाख चार हजार रुपये उकळले . मात्र वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे समजतात तरुणाने जुहू पोलीस ठाण्यात या अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवली आहे.

तरुणाच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी कलम 385,419 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा नुसार कलम 66c, 66d अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com