Pune Sadashiv Peth News: सदाशिव पेठ महाविद्यालयीन तरुणी हल्ला प्रकरण; पोलीस हवालदारासह तिघेजण निलंबित

Pune Crime News: या हल्ला प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

Pune Sadashivpeth News: पुण्यातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. भररस्त्यात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हल्ला प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Pune Crime News
Ashadhi Ekadashi 2023: सलग २५ वर्षांपासून पायी वारी, आता मिळाला विठ्ठलाच्या महापूजेचा मान; जाणून घ्या कोण आहे काळे दाम्पत्य

पोलीस (Police) उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी (ता. २८) रात्री जारी करण्यात आले आहेत.

पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत (Pune News) मंगळवारी सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते.

Pune Crime News
Maharashtra Rain Alert: राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे; 'आषाढी'च्या दिवशी या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

तसेच, या तरुणीसमवेत असलेल्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या आरोपीला (Crime News) अटक केली. परंतु पेरूगेट पोलrस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी गैरहजर होते.

त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली. दरम्यान, आरोपी शंतनू जाधव या तरुणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सध्या त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com