मीरा रोडमध्ये खळबळजनक घटना
शिवसेनेच्या परप्रांतिय कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
मारहाणीत मनसेच्या पदाधिकाऱ्याला गंभीर दुखापत
मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. परप्रांतीय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर मीरा रोडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहण
या मारहाणीत मनसेचा पदाधिकारी स्वप्निल तपासे जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालय उपचार सुरू आहेत. रामदेव पार्क परिसरात महापालिकेच्या जलवाहिनी अंथरण्याचे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे त्याचा त्याचा व्हिडिओ करण्यासाठी मनसे पदाधिकारी रेश्मा तपासे या घटनास्थळी गेल्या होत्या. त्याचवेळी ही मारहाण करण्यात आली.
परप्रांतियाकडून मनसे पदाधिकाऱ्याला धमकी
जेव्हा मनसेचे पदाधिकारी व्हिडिओ काढत होते तेव्हा त्यांच्या मागे एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत धूम्रपान करत उभा राहिला. याबाबत मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे यांनी त्याला जाब विचारला. त्यावर संबंधित व्यक्तीने विरोध करत "तुझं कच्चं मटण मला खायचं आहे" अशी थेट धमकी दिली.
नागरिकाने मनसेच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. दोघेही एकमेकांना मारहण करत होते. या दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने दगडाने स्वप्निल तपासे यांच्या डोक्यावर हल्ला केला. यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त आलं. या घटनेनंतर स्वप्नील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.