​Nashik Crime: ८ तरुणींच्या लैंगिक शोषणानंतर धर्मांतर अन् बीफ खाण्याची सक्ती; नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना उघडकीस

Nashik IT Company: नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीतील तरुणींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आता धर्मांतराचे प्रकरण उघड झाले आहे. हिंदू तरुणाला जबरदस्ती धर्मांतर करायला लावत त्याला बीफ खाण्याची सक्ती करण्यात आली.
​Nashik Crime: ८ तरुणींच्या लैंगिक शोषणानंतर धर्मांतर अन् बीफ खाण्याची सक्ती; नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना उघडकीस
Nashik Crime Saam Tv
Published On

Summary -

  • नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरण

  • ८ तरुणींच्या लैंगिक शोषणानंतर धर्मांतर अन् बीफ खाण्याची सक्ती

  • ६ आरोपींना अटक तर २ महिला आरोपी फरार

  • एसआयटीमार्फत तपास सुरू करण्यात आला

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत तरुणींच्या लैंगिक शोषणासह धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांतर झालेल्या पीडित तरुणाचे फोटो समोर आले असून त्याला विशिष्ट पोषाख घालण्यास आणि धार्मिक चालीरीती पाळण्यास दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील फोटो समोर आले आहेत. याच कंपनीतील एका तरुणाला संशयित आरोपींनी धर्मांतर करायला लावण्याचा आरोप आहे. संशयित तैसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. कंपनीतील हिंदू तरुणाला दुपारच्या वेळेस नमाज पठण करायला लावली जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय हिंदू तरुणाला बीफ खाऊ घातल्याचाही फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू तरुणाचे धर्मांतरानंतरचे फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

​Nashik Crime: ८ तरुणींच्या लैंगिक शोषणानंतर धर्मांतर अन् बीफ खाण्याची सक्ती; नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना उघडकीस
Nashik : वर्दीचा रुबाब आणि AI चा डर्टी गेम, महिलांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात ८ पैकी ६ जाणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन महिला आरोपी फरार आहेत. या कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर आणि एक महिला आरोपी फरार आहे. पीडितांनी महिला ऑपरेशन मॅनेजरकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही फरार महिला आरोपींच्या शोधासाठी नाशिक पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. महिला कर्मचाऱ्यांचं शोषण, मानसिक छळ प्रकरणी नाशिक पोलिसांत आत्तापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी देण्यात आली आहे.

​Nashik Crime: ८ तरुणींच्या लैंगिक शोषणानंतर धर्मांतर अन् बीफ खाण्याची सक्ती; नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना उघडकीस
Nashik : खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक कांड, नामांकित कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com