MHADA news  Saam tv
मुंबई/पुणे

MHADA HOME: स्वस्तात घर खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडा बांधणार ७ लाख घरं; कोणत्या ठिकाणी किती सदनिका?

MHADA Lottery: म्हाडाच्या घरांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहेत. म्हाडा ७ लाखांपेक्षा जास्त घरं बांधणार आहे. त्यामुळे अनेकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या घरांचे लोकेशन काय असणार आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • मुंबईकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार

  • म्हाडा ७ लाख घर बांधणार आहे

  • पुढच्या ५ वर्षांसाठीचा म्हाडाचा प्लान

  • मुंबई शहरामध्ये २ लाखांहून अधिक घरं बांधली जातील

म्हाडाची घरं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाकडून तब्बल ७ लाख घरांची निर्मिती केली जाणार आहे. पुढच्या ५ वर्षात ही घरं बांधण्याचा म्हाडाचा प्लान आहे. यामुळे मुंबईनजीक घर खरदी करण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट या प्रदेशातील दीर्घकालीन घरांच्या कमतरतेवर मात करणे, परवडणारी घरं उपलब्ध करून देणे आणि शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, पुढच्या ५ वर्षामध्ये मुंबई महानगर प्रदेशामध्ये ७ लाखांपेक्षा जास्त घरं बांधली जातील. त्यापैकी अंदाजे साडेपाच लाख घरं ही मुंबईमध्ये बांधली जातील. ही सर्व घरं विविध योजनांतर्गत बांधली जाणार आहेत. ही सर्व घरं लॉटरीद्वारे विकली जाणार आहेत.

सायनमधील जीटीबी कॉलनी, अंधेरीतील एसव्हीपी नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर आणि मुंबई सेंट्रलजवळील कामाठीपुरा यासारख्या भागात पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे पुढील ५ ते ७ वर्षांत मुंबई शहरामध्ये २ लाखांहून अधिक घरं बांधली जातील. मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या, जलद गतीने शहरीकरण आणि सतत वाढत्या रिअल इस्टेटच्या किमतींमुळे मुंबईला घरांच्या मागणी आणि पुरवठ्यातील वाढत्या तफावतीचा सामना करावा लागत आहे.

म्हाडा मुंबईत अनेक क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये सायनमधील जीटीबी कॉलनी, अंधेरीमधील एसव्हीपी नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर आणि मुंबई सेंट्रलजवळील कामाठीपुरा यांचा समावेश आहे. म्हाडाच्या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुढील ५ ते ७ वर्षांत शहरात २ लाखांहून अधिक घरे बांधली जातील.

दरम्यान, ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृहात शनिवारी कोकण क्षेत्रातील ५,३५४ घरे आणि ७७ भूखंडांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांत म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने तीन लॉटरी सोडतीद्वारे १३,५०० हून अधिक घरे विकली आहेत. गेल्या ३ वर्षांत, म्हाडाने राज्यभरात १८ लॉटरी सोडती काढल्या आहेत. ज्यामध्ये अंदाजे ४३,००० घरे विकली गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT