Pune Mhada Lottery 2024  Saam TV
मुंबई/पुणे

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Mhada House Application Date Extended: म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. म्हाडा पुणे येथील ६९२४ घरांसाठी अर्ज करण्याची तारीख १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

ज्या लोकांना स्वतः चे घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ६२९४ घरांच्या विक्रीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. सहा हजार २९४ घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही १० डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

नवीन वेळापत्रकानुसार, पुणे मंडळाच्या कार्यालयात पहिली सोडत ७ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीसीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीमधीलएमेक घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. विविध योजनांमधील घरांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. १० ऑक्टोबरपासून या घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. नागरिकांची घरांसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांच्या मागणीनंतर आता घरांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर करण्यात आली आहे. यामध्ये २,३४० घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमांनुसार दिली जाणार आहे. आता १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ पर्यंत अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

यामध्ये ९३ घरे म्हाडा योजनेअंतर्गत आहेत. तर ४१८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Aawas Yojana) तयार करण्यात आली आहे. १० डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. १२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाईल. १३ डिसेंबर रोजी अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.

प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत https://lottery.mhada.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज भरावा. तसेच इतर योजनांसाठी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज भरावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT