मार्चमध्ये म्हाडाच्या 3000 घरांची लॉटरी जाहीर होणार
मुंबई, पुणे आणि कोकण मंडळातील घरांचा समावेश
अनेक पुनर्विकास प्रकल्प प्रगतीपथावर
सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळणार
मुंबईमध्ये हक्काचे घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मार्चमध्ये म्हाडाच्या तब्बल ३००० घरांची लॉटरी निघणार आहे. मुंबई, पुण्यासह कोकण मंडळातील घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपवणार आहे.
मुंबईमध्ये खिशाला परवडेल आणि स्वस्त:त घर मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. पण मुंबईत घराच्या किंमतींनी उच्चांक गाठल्यामुळे अनेकांना घर घेणं शक्य होत नाही. अशामध्ये म्हाडाच्या घरांचा उत्तम पर्याय असतो. म्हाडाची ही घरं बाजार भावापेक्षा अत्यंत स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे म्हाडाची घरं खरेदीकडे अनेकांचा कल असतो. आता म्हाडाची ३००० घरांची लॉटरी निघणार असल्यामुळे अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाची ही लॉटरी मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
ऐवढेच नाही तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे ४००० घरांसाठी देखील लॉटरी काढण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, बीडीडी चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जीटीबी नगरमधील पंजाब कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर आणि अंधेरीमधील सरदार वल्लभभाई पटेलनगर या ठिकाणचे म्हाडाचे प्रकल्प हे नियोजनाच्या टप्प्यामध्ये आहेत.
अशी असेल म्हाडाची लॉटरी -
- मार्चमध्ये म्हाडाच्या ३ हजार घरांची लॉटरी निघणार आहे
- पुण्यासह कोकण मंडळाची घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील
- अनेक पुनर्विकास प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहेत
- पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल.
- घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.