MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Thane Kalyan MHADA Lottery for 2000 Houses: ठाणे, कल्याण यासारख्या परिसरात घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता म्हाडाच्या २००० घरांसाठी लॉटरी निघणार आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
MHADA Lottery
MHADA LotterySaam Tv
Published On
Summary

घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

म्हाडाच्या २००० घरांसाठी लॉटरी निघणार

ठाणे, कल्याणा भागात घरांसाठी लॉटरी

घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, घोटेघर आणि डोंबिवलीत घरांसाठी लॉटरी निघणार आहे.यामुळे तुमचे ठाणे, डोबिंवलीसारख्या परिसरात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

MHADA Lottery
SBI Home Loan: एसबीआयचा लाखो ग्राहकांना दिलासा, व्याजदरात केली कपात, किती पैसे वाचणार?

फेब्रुवारीत निघणार लॉटरी

कोकण मंडळाकडून दोन हजार घरांसाठी जाहिरात फेब्रुवारीमध्ये काढली जाणार आहे. यानंतर आता एप्रिल- मे महिन्यात ही लॉटरी निघणार आहे. यामुळे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईसह एमएमआरमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे खासगी विकासकांकडे घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाची ऑक्टोबरमध्ये घरांच्या लॉटरीची जाहिरात येणे अपेक्षित होती. मात्र, पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने लॉटरी जाहीर झालेली नव्हती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

घर घेणाऱ्यांना दिलासा

आता म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारीमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.त्यामध्ये खासगी विकसकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या १५ टक्के आणि २० टक्क्यांमधून मिळणाऱ्या घरांबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश असणार आहे.

MHADA Lottery
MHADA Lottery: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, वाकड अन् हिंजवडीत घ्या फक्त २८ लाखांत घर; कुठे अन् कसा कराल अर्ज?

कोकण मंडळाच्या ठाणे, कल्याण परिसरातील घरांना मोठी मागणी आहे. २०२५ मध्ये ५ हजार घरांसाठी दीड लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीदेखील लॉटरीला खूप चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असं सांगितलं जात आहे.

MHADA Lottery
Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com