MHADA Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

MHADA Lottery Registration Deadline Increases: म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे. आता तुम्ही २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ

२८ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

मुंबईत हक्काचे घर घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसह, भूखंडाच्या सोडतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. तब्बल ५,२८५ घरांसह ७७ भूखंडासाठी नोंदणी सुरु झाली आहे. यासाठी अर्जविक्री-स्विकृती प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे.

अंतिम तारीख वाढवली (MHADA Home Registration Deadline Increases)

आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. आता अजून १५ दिवस तुम्हाला अर्ज करता येणार आहे.सध्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट होती.मात्र, ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.आता तुम्हाला २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आता घरांसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरांची सोडत १८ सप्टेंबरला निघणार आहे. याआधी सोडत ३ ऑगस्टला निघणार होती.

कोणत्या ठिकाणी किती घरे?

म्हाडाच्या कोकण मंडळाने घरे आणि भूखंडासाठी लॉटरी काढली आहे. यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२ घरे, म्हाडाच्या १६७७ प्रक्रिया सुरु केली आहे. याचसोबत ७७ भूखंडासाठीही अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना अजून १५ दिवस अर्ज करता येणार आहे.

लॉटरी कधी निघणार? (Mhada Lottery Annoucement Date)

अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ३ सप्टेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र, आता ३ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे. तसेच १४ ऑगस्टऐवजी २८ ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता येणार एसल्याचे कोकण मंडळाच्या अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT