Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Mhada Home Price Will Decrease: म्हाडाच्या घरांच्या किंमती आता कमी होण्याची शक्यता आहे. आता रेडिरेकनरशिवाय प्रत्यक्षात जो खर्च होईल त्याचीच किंमत निश्चित केली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार आहेत.
Mhada Home Price
Mhada Home PriceSaam Tv
Published On
Summary

म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे मिळणार

रेडिरेकनरशिवाय प्रत्यक्षात जो खर्च होईल त्याचीच किंमत निश्चित होणार

मुंबईत स्वतः चे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु मुंबईत घर घेणे हे सर्वांना परवडत नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरे विकत घेतात. म्हाडाच्या घराच्या किंमती तुलनेने कमी आहेत. या किंमती अजून कमी होण्याची शक्यता आहे.म्हाडाच्या घरांच्या किंमती आठ ते दहा टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे मिळावी, यासाठी म्हाडा नेहमीच प्रयत्न करते. घरांच्या किंमती निश्चित करताना रेडीरेकनर दराशिवाय प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किंमतीमधील वाढ, गुंतवणूकीवरील व्याज या बाबी लक्षात घेतल्या जातात. त्यामुळे रेडिरेकनर दराशिवाय प्रत्यक्षात जो खर्च होईल त्याचीच किंमत गृहित धरली जाईल.

Mhada Home Price
MHADA Mumbai : मुंबईत म्हाडाच्या १२ हजार घरांची बंपर लॉटरी, कोण-कोणत्या ठिकाणी किती घरं उपलब्ध होणार?

अन्य वाढीव दर हे म्हाडाच्या घरांच्या किंमतीत धरु नयेत, अशी भूमिका म्हाडाच्या घरांच्या किंमती पुनर्रचना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीने घेतली आहे. याबाबत समितीचा अहवाल लवकरच म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती जास्त असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे म्हाडाने घरांच्या किंमती थोड्या कमी करुन नागरिकांना दिलासा दिला होता. त्यानंतर आता या किंमती अजून कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घराच्या किंमती निश्चित करण्यासाठी रेडिरेकनरचा दर विचारात घेतला जातो. याचसोबत अनेक चार्जेस लागतात. त्यात प्रशासकीय कऱ्च पाच टक्के, बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ, जमीनीच्या रक्कमेवरील व्याज यामुळे घरांच्या किंमती १०-१५ टक्क्यांहून अधिक वाढतात.

Mhada Home Price
MHADA Lottery: ठाण्यात म्हाडाचं फक्त १३ लाखात घर! कोणत्या भागात किती घरे?

हे दर सरसकट न लावता फक्त प्रकल्पासाठी लागणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किंमती, इन्फ्रावर जेवढा खर्च झाला आहे तेवढ्या रकमेचा किंमतीत समावेश केला जावा, अशा निष्कर्यापर्यंत समिती आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील घरांच्या दरात घट होणार आहे.

Mhada Home Price
Mhada 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; नोंदणी अन् अर्ज कुठे कराल? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com