MHADA Lottery 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

Priya More

संजय गडदे, मुंबई

म्हाडा मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी काढली आहे. या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत सोडतीसाठी 1,34344 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 113568 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. 19 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करण्यास परवानगी होती.

सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरूवात झाली होती. गेल्यावर्षी 4082 घरांसाठी प्राप्त 145000 अर्जांपैकी 119278 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरे कमी असतानाही नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

27 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सोडतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दहावी हरकती दाखल करण्यासाठी 29 सप्टेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी अंतिम यादी 3 ऑक्टोबर रोजी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News Update : मराठीला नाही म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप; पहा काय आहे प्रकार

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT