MHADA extends Pune housing lottery deadline — citizens get extra time to apply for dream homes. saam tv
मुंबई/पुणे

MHADA: घराचं स्वप्न होईल पूर्ण; पुणे म्हाडानं सोडत अर्जाची मुदत वाढवली, काय आहे कारण ?

Pune MHADA Application Deadline : म्हाडाने पुण्यातील गृहनिर्माण लॉटरीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे नागरिकांना घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. नवीन अंतिम तारखेच्या मुदतवाढीमागील कारणे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • म्हाडा पुणे गृहयोजनेच्या अर्जाची मुदत वाढवण्यात आलीय.

  • नागरिकांच्या मागणीवरून म्हाडाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.

  • सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती अभाळाला भिडल्या आहेत.सामन्य वर्गातील अनेकांना पुणे, मुंबई शहरात घरं घेणं शक्य होत नाही. तिची बाब लक्षात घेत नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा मदत करते. म्हाडा मधून सदनिका घेण्यासाठी अनेकजण र्ज करत असतात. म्हाडामार्फत पुण्यात घरं विकली जाणार आहेत.

या घरांच्या सोडतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोडत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ सप्टेंबर होती, आता त्यात बदल करण्यात आलाय. नागरिकांची मागणी ऐकत म्हाडाकडून तारखेत बदल करण्यात आलाय.

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का?

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आलीय. विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ सांगण्यात आली होती. परंतु नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात येत होती.

अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार आणि लॉटरीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानुसार अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. यासह इतर मजकूरही ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील. याबाबतची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी दिलीय.

अर्ज आणि पेमेंटसंबंधी महत्त्वाचे नियम

अनामत रक्कम (Deposit Amount): सोडतीपूर्वी अनामत रक्कम भरल्यानंतर अर्ज कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाही.

क्रेडिट कार्ड पेमेंट (Credit Card Payment): अर्जदाराने क्रेडिट कार्डद्वारे अनामत रक्कम भरली आणि ती रक्कम कोणत्याही कारणाने म्हाडाच्या खात्यात जमा न झाल्यास किंवा पोहोचण्यापूर्वी अर्जदाराच्या खात्यात परत वर्ग झाले तर अशा अर्जदारांचा अर्ज सोडतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज करणाऱ्या इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://housing.mhada.gov.in भेट द्यावी.

तर मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी MHADA Lottery हे ॲप (App) देखील डाउनलोड करता येईल.

ऑनलाईन अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्याची पद्धत आणि घरांच्या किमती यांसारख्या सविस्तर माहितीसाठी 'म्हाडा लॉटरी 2025' या लिंकवर क्लिक करून जाहीरातीची पीडीएफ फाईल चेक करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT