MHADA Homes Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Homes: कल्याण- डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, स्वस्तात मस्त घरं मिळणार; म्हाडाने सांगितला प्लान

MHADA Lottery 2025: कल्याण-डोंबिवलीमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याठिकाणी म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या खिशाला परवतील अशी स्वस्तात मस्त घरं तयार केली जाणार आहे. काय आहे म्हाडाचा प्लान वाचा...

Priya More

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये लवकरच म्हाडाचे स्वस्तात मस्त घरं मिळणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे या घरांची सोडत निघणार आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत ही सोडत निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडातर्फे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि विरारसह मुंबई महानगर प्रदेशमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या जवळपास ४००० घरांसाठी सोडत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे ही सोडत निघणार आहे. जुलै किंवा ऑगस्टपर्यंत ही सोडत जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या सोडतमध्ये ठाणे, कल्याण आणि कोकण भागात सर्वाधिक घरं असणार आहेत.

मुंबईच्या बाहेरील भागामध्ये परवडणाऱ्या घरांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे म्हाडाकडून या भागांमध्ये आता घरं तयार केली जाणार आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता म्हाडाकडून ही सोडत काढण्यात येणार आहे. प्राधिकरणाने पुढील २ वर्षांत राज्यभरात ३२००० नवीन घरं बांधण्याची योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये फक्त मुंबईत ७ हजार घरं तयार करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात, म्हाडाने संपूर्ण महाराष्ट्रात १९,४९७ घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. ज्यामध्ये एकट्या मुंबईत ५,१९९ घरांचा समावेश आहे. या निर्णयामुळे एजन्सीमार्फत परवडणाऱ्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो लोकांना स्वस्त दरात घरं मिळतील असे म्हटले जात आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात प्रदेशनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये कोकण प्रदेशासाठी सर्वाधिक ९,९०२ घरे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानंतर पुण्यात १,८३६, छत्रपती संभाजीनगरमध्ये १,६०८, नागपूरमध्ये ६९२, अमरावतीमध्ये १६९ आणि नाशिकमध्ये ९१ घरे बांधण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT