ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, लोक मुलतानी मातीपासून ते बेसनापर्यंत विविध घरगुती उपायांचा वापर करतात.
असाच एक घरगुती उपाय हणजे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट.असे मानले जाते की कडुलिंबाची पेस्ट लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
पेस्ट कशी लावावी आणि रोज चेहऱ्यावर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्यास काय होते ते जाणून घ्या.
कडुलिंबाचे फेसपॅक किंवा पेस्ट लावल्याने पिंपल्स येणे थांबते. बाजारात कडूलिंबापासून बनवलेले अनेक फेसवॉश देखील उपलब्ध आहेत.
त्वचेवर अनेकदा ब्लॅकहेड्स दिसतात. कडुलिंबाची पेस्ट लावल्याने ब्लॅकहेड्स कमी होण्यास आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ राहण्यास मदत होते.
कडुलिंबाची पेस्ट त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते.
जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर कडुलिंबाची पेस्ट लावल्याने डाग जाण्यास मदत होते.
कडूलिंबीची पाने सुकवून बारिक करुन पावडर करुन घ्या. पावडर दह्यात मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर आठवड्यातून तीन वेळा लावावी.