Skin Care : मानेवरील काळपटपणा दूर करायचाय? मग 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळपट मान

उन्हाळ्यात, घाम आणि प्रदूषण तुमच्या मानेवरील त्वचा काळी आणि कोरडी करू शकतो, ज्यामुळे ती खूपच विचित्र दिसते. मानेवरील काळी त्वचा दूर करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय वापरून पाहू शकता.

Neck Tan | GOOGLE

लिंबू मध पॅक

लिंबाचा रस मधात मिक्स करा आणि तो तुमच्या मानेला लावा. २० मिनिटांनी, कोमट पाण्याने तुमची मान स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.

lemon honey pack | GOOGLE

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस कापसाच्या गोळ्याने मानेवर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. बटाट्यातील नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म टॅनिंग कमी करण्यास मदत करतात.

Potato Juice | GOOGLE

दही आणि हळद

दह्यात थोडी हळद मिक्स करुन पेस्ट बनवू घ्या. तयार केलेली पेस्ट मानेवर २० मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावावा.

Curd Pack | GOOGLE

कोरफड जेल

तुमच्या मानेला ताजे कोरफडीचे जेल लावा आणि २० मिनिटे सुकू द्या. नंतर मान थंड पाण्याने स्वच्छ धुवा. कोरफडी त्वचेला आराम देते आणि टॅनिंग हलके करते.

Aloe vera Gel | GOOGLE

बेसन दुधाचे स्क्रब

बेसन, दूध आणि चिमूटभर हळद वापरून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या मानेवर हळूवारपणे लावा आणि स्क्रब करा. नंतर १५ मिनिटांनी धुवा.

Besan & Milk Pack | GOOGLE

टोमॅटोचा गर

टोमॅटो मॅश करा त्याचा गर तुमच्या मानेवर १५ मिनिटे लावा. टोमॅटोमधील लायकोपिन टॅनिंग आणि सनबर्न कमी करण्यास मदत करते.

Tomato Pack | GOOGLE

महत्त्वाची टीप

उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. तसेच मान झाकण्यासाठी स्कार्फ किंवा दुपट्टाचा वापर करा.

Sunscreen | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Doctor | GOOGLE

Skin Care : तांदूळ आणि बटाट्यापासून बनवा 'हे' घरगुती फेस मास्क, मिनटांतच त्वचा दिसेल ग्लोइंग

Face Mask | GOOGLE
येथे क्लिक करा