MHADA Home: मुंबईत १२ लाखांत घर, म्हाडाकडून अटींमध्ये बदल; अर्ज भरण्याची अंतिम तारिख कोणती?

BMC Employees Can Now Own a Home in Mahul for Rs 12.60 Lakh: मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. माहुल परिसरात फक्त ₹१२.६० लाखांत घर घेता येणार आहे.
MHADA Housing Lottery
MhadaSaam tv
Published On

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. पण स्वप्न नगरीत घर घेणं काहींच्या आवाक्याबाहेर जातं, आणि याला कारण आहे घराच्या अव्वाच्या सव्वा किमती. मुंबई उपनगरात घर घेण्याचा विचार जरी केला तरी, ८० ते ९० लाखांत घर मिळणं शक्यच नाही. पण आता मुंबईत आपल्याला १२ लाखांत घर मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार असून, या घरांसाठीच्या अटींमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.

म्हाडाने माहुलमध्ये तब्बल ४७०० घरे बांधली आहेत. ही घरे महापालिकेचे कर्मचारी १२ लाख ६० हजार रुपयांत घेऊ शकतात. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसांठी घरांची विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्याला प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे प्रशासनाने अटींमध्ये काही बदल केले आहेत.

MHADA Housing Lottery
Dombivli: देवपूजा करताना अनर्थ! दिव्याची वात अंगावर पडली, महिलेचा होरपळून मृत्यू

बदललेल्या अटींनुसार, आता श्रेणी १ मधील कर्मचारी वगळता सर्वच श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी या घरांसाठी अर्ज करू शकतात. मुख्य म्हणजे, अर्ज करण्याची मुदत देखील १५ मे पर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

MHADA Housing Lottery
Solapur Crime: बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टरचा मृतदेह, बाजूला चाकू अन् कात्री; आत्महत्या की हत्या? मृत्यूचं गूढ वाढलं

एमएमआरडीएने प्रकल्प बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी महापालिकेला सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. मात्र, अनेक घरे रिक्त राहिल्याने ती कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय म्हाडकडून घेण्यात आला. मुंबई महापालिका प्रशासन म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच लॉटरी पद्धतीनं स्वत:ची घरे देणार आहेत. माहुल परिसरात २२५ चौ. फुटांची ४ हजार ७०० घरे बांधली असून, १२ लाख ६० हजारात ही घरे विकली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com