CENTRAL RAILWAY SPECIAL BLOCK ON JUNE 13-14: MANY MUMBAI LOCAL TRAINS CANCELLED, DIVERTED AND SHORT-TERMINATED Saam tv
मुंबई/पुणे

Mega Block Today : प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेवर आज आणि उद्या पॉवर ब्लॉक; 'या' ट्रेन राहणार बंद

Mumbai Loal Train Mega Block Today : दिवा स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने आज आणि उद्या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. ठाणे-कल्याण दरम्यान अनेक लोकल गाड्या रद्द, करण्यात येणार आहे.

Alisha Khedekar

  • दिवा स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या मेगा ब्लॉक

  • ठाणे-कल्याण दरम्यान अनेक लोकल गाड्या रद्द

  • काही लोकल गाड्या जलद मार्गावरून धावणार

  • ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत

Mumbai Railway Local Train Mega Block Today प्रवाशांसाठी मोठी बातमी! आज म्हणजेच १३ जून आणि उद्या १४ जून रोजी जर ररेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक बघून बाहेर पडा, कारण मध्य रेल्वेच्या १३ आणि १४ जूनच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने दिवा स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या (एफओबी) उभारणीसाठी महत्त्वाचे काम हाती घेतले असून त्यासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे आणि कल्याणदरम्यान उपनगरी रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार असून अनेक लोकल गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट किंवा वळवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकाच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला नवीन पादचारी पुलासाठी गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ जूनच्या मध्यरात्री १.२० वाजल्यापासून १४ जून रोजी पहाटे ५.४० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक लागू असेल. या कालावधीत कळवा ते डोंबिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद तसेच धीम्या मार्गांवर रेल्वे वाहतुकीवर निर्बंध राहतील.

ब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण स्थानकांमधील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काही अप धीम्या लोकल गाड्या कल्याण आणि ठाणे दरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जाणार असून त्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. परिणामी या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे सुटणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्यांचा प्रवास कुर्ला, परळ आणि ठाणे स्थानकांवरच समाप्त करण्यात येणार आहे. तर काही गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी कुर्ला, ठाणे किंवा कल्याण येथून शॉर्ट ओरिजनेट केल्या जाणार आहेत.

या ब्लॉकचा परिणाम काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस तसेच हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या कल्याण आणि ठाणे दरम्यान सहाव्या मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे त्या नियोजित शेवटच्या स्टेशनला १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे काम आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले असून होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात चहासोबत बनवा हॉटेल स्टाईल क्रिस्पी ओनियन रिंग्स, सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भाईंदरमध्ये झाड कोसळून तरुणाचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट, सियाचा आणखी एक मोबाइल जप्त; कोर्टात नेमकं काय घडलं?

भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे; भरसभागृहात महायुतीच्या नेत्याचे खळबळजनक विधान

Monsoon Special Food : पावसाळ्यात घरी झटपट अशी बनवा वांग्याची भजी

SCROLL FOR NEXT