Sunil Shelke News Saamtv
मुंबई/पुणे

Maval News: पवनेच्या पाण्यावरुन मावळचे राजकारण तापले! 'सत्तेत असलो तरी 'बंद जलवाहिनी' प्रकल्पाला विरोध...' आमदार सुनील शेळकेंची भूमिका

Pavana Jalvahini Scheme: पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठविल्यानंतर मावळात राजकारण पेटू लागले आहे.

दिलीप कांबळे

Maval News: पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा केला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनी राज्य सरकारने या आदेशावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या जलवाहिनीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मावळचे राजकारण तापले असून सत्तेत असलो तरी पवना जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करणार असल्याची भूमिका आमदार सुनील शेळके यांनी घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठविल्यानंतर मावळात राजकारण पेटू लागले आहे. पवना जलवाहनी बनविण्याचा प्रस्ताव तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढला होता. त्यावेळी विरोध दर्शवत प्रखर आंदोलन झाले होते.

मात्र आता बंदी उठविल्यानंतर मावळमधील (Maval) सर्वपक्षीय एकत्र येऊन विरोध करत आहेत. मावळ मधील स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सरकारने विश्वासात न घेताच हा निर्णय केला असल्याचा आरोप केला आहे.

धरणग्रस्तांचे पुनर्वसन आदींची पूर्तता न करताच हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही. शेतकरी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बाजूने मी ठामपणे उभा राहणार असल्याचा पवित्रा राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

SCROLL FOR NEXT