Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv

Balasaheb Thorat News: चांगले सरकार मोडून सत्ता स्थापन करण्याची भाजपची निती: बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

Jalgaon News : चांगले सरकार मोडून सत्ता स्थापन करण्याची भाजपची निती: बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल
Published on

जळगाव : कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश यानंतर भाजपने महाराष्ट्रात पैशांच्या जोर चालविला. या जोरावर भाजपने (BJP) लोकशाही पद्धतीने चाललेले सरकार आणि लोकशाही पद्धतीने चाललेली व्यवस्था ही तोडून काढते. हे जनतेला काही पटलं नाही; असा हल्लबोल करत येणाऱ्या काळात आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला. (Tajya Batmya)

Balasaheb Thorat
Ahmednagar Crime News: हक्काच्या पैशांसाठी गमवावा लागला जीव; मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांनी केली हत्या

काँग्रेस पार्टीची जनसंवाद यात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू झाली असून जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेची सांगता समारंभ सभा आज सावदा येथे होणार आहे. यावेळी थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला आहे. 

सर्वांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा
राजकारणाचा पलिकडे जाऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. मराठा आक्षणाबाबत जो काही निर्णय हे सरकार घेईल; त्याला आमचे समर्थन राहणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले. 

Balasaheb Thorat
Maratha Aarkshan : सरकारची अंत्ययात्रा काढत केला अंत्यविधी; बीडच्या नांदूरमध्ये मराठा समाज आक्रमक

मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी शासन आपल्या दारी उपक्रम
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जनतेला फक्त मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठीच जमा केले जाते. तसेच मोठ्या प्रमाणात दाखले साठवून हा कार्यक्रम करण्यात येतो. जनतेची जर खरीच मदत करायची असेल, तर त्यांना या सुविधा घरपोच द्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com