बीड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात रोज एक नवे आंदोलन उभारले जात आहे. (Maratha Aarkshan) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे. त्यानुसार बीडच्या (Beed) नांदूरमध्ये महाराष्ट्र सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. (Live Marathi News)
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात आले आहे. यात जालना येथे आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक आक्रमक झाले व संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत. याच दरम्यान बीडच्या नांदूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज मराठा बांधवांनी सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही; म्हणून सरकारची अंत्ययात्रा काढत थेट अंत्यविधी केला आहे.
प्रतिकात्मक फोटोचा केला अंत्यविधी
नांदूर गावातून विधीवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोची पूर्ण गावातून व बाजारातून अंत्यायात्रा काढली गेली. त्यानंतर गावाच्या बाहेर देवी मंदिर परिसरात अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.