Best Time for Exercise: व्यायाम कधी करावा, सकाळी की संध्याकाळी? हृदयाच्या आरोग्यासाठी 'ही' वेळ महत्वाची

Shruti Vilas Kadam

व्यायामाची वेळही महत्त्वाची

शरीरातील हार्मोन्स, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि मेटाबॉलिझम दिवसभर बदलत असतात. त्यामुळे व्यायामाच्या वेळेनुसार शरीराची प्रतिक्रिया बदलू शकते.

Best Exercises | saam tv

सकाळी व्यायाम हृदयासाठी फायदेशीर

सकाळी नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज, ब्लड प्रेशर , टाइप-2 डायबिटीज आणि लठ्ठपणाचा धोका कमी असतो. त्यामुळे सकाळी व्यायम करणे फायदेशीर ठरते.

best exercise for women | saam tv

संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे

काही संशोधनानुसार संध्याकाळच्या व्यायामामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले सुरु राहते. त्यामुळे संध्याकाळचा व्यायामही हृदयासाठी उपयुक्त ठरू शकतो.

Exercise | yandex

व्यायाम करणे महत्वाचे

सकाळचा व्यायाम संध्याकाळपेक्षा अधिक फायदेशीर असल्याचे ठोस पुरावे आढळले नाहीत. पण, व्यायाम कोणत्याही वेळी करता येऊ शकते.

Best Exercise

झोपेची वेळ लक्षात घ्या

रात्री झोपण्याच्या आधी जास्त व्यायाम केल्यास काही लोकांना झोप लागण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे झोपण्याआधी जास्त व्यायाम करणे टाळा.

Exercise | Yandex

वेळेपेक्षा सातत्य महत्वाचे

तुमच्यासाठी जी वेळ सोयीची आहे त्यावेळी व्यायाम करू शकता. सकाळ असो किंवा संध्याकाळ नियमित शारीरिक हालचाल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Exercise | yandex

आठवड्यात किती वेळ व्यायाम करावा?

आठवड्यातील पाच दिवस ३० मिनिटे व्यायाम करावा यामध्ये जर, चालत असाल तर शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Exercise | pinterest

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे 7 आरोग्यदायी फायदे

clove water benefits | Saam Tv
येथे क्लिक करा