Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

अँटिऑक्सिडंट्स मिळण्यास मदत

लवंगामध्ये युजेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होते आणि शरिर रिलॅक्स राहण्यास मदत होते.

Clove Water | Canva

पचनासाठी उपयुक्त ठरू शकते

काही लोक जेवणानंतर पचनासाठी लवंगाचे पाणी पितात. लवंगाच्या पाण्यामुळे गॅस, अपचन किंवा पोट फुगणे कमी करते. पचनाचा त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Clove Water Benefits

पचनासाठी उपयुक्त ठरू शकते

लवंगातील युजेनॉलचा वापर काही डेंटल ट्रिटमेंटसाठी देखील केला जातो. यामुळे दातांमध्ये होणारी वेदना काही काळासाठी थांबू शकते.

clove water for phlegm | saam tv

शरीरातील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर

लवंगातील युजेनॉलमुळे शरिराची सूज किंवा जळजळ सारखे त्रास कमी होतात. त्यामुळे सांधे दुखी किंवा शरिराला सूज असेल तर लवंगाचे पाणी फायदेशीर ठरते.

drinking clove water daily | saam tv

रक्तातील साखरेबाबत काळजी घ्या

लवंगाचे पाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे डायबिटिज असल्यावर सकाळी लवंग पाणी पिणे शरिरासाठी फायदेशीर ठरते.

Clove Water | Yandex

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेश्या झोपेसोबत सकाळची सुरुवात लवंगच्या पाण्याने करा.

Clove Water | Social Media

लवंगचे पाणी बनवण्याची सोपी पद्धत

एका कप पाण्यात एक ते दोन लवंग घालून काही मिनिटे उकळा. त्यानंतर पाणी थोडे कोमट होऊ द्या आणि गाळून घ्या. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला तसेच रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Clove Water | Social Media

Imran Khan: इम्रान खानला देश सोडून जाण्याचे नोटीस का मिळाले? अभिनेता नक्की कोणत्या देशाचा नागरिक आहे?

Imran Khan | Saam Tv
येथे क्लिक करा