Maharashtra News Live Update: मराठवाड्यातील 370 प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याचे संकट!

Marathi Breaking Live Headlines Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे अपडेट, टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, सीजेपी, राज्यासह देशातील हवामानाचे अपडेट, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

मराठवाड्यातील 370 प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याचे संकट!

मराठवाड्यातील 370 प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याचे संकट!

235 प्रकल्पांत पाणीसाठा शून्य; 135 प्रकल्पांमध्येही पाणी अत्यल्प

बीडमध्ये सर्वाधिक 87, तर लातूरमध्ये 86 प्रकल्प संकटात

काही प्रकल्पांतील पाणी फक्त एक-दोन महिने पुरणार

रायगडात शिवसेना-राष्ट्रवादीत वाकयुद्ध पेटलं

रायगडात शिवसेना-राष्ट्रवादीत वाकयुद्ध पेटलं

दळवींच्या टीकेला अनिकेत तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

सुनील तटकरेंनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावे दळवींचा खोचक सल्ला

दळवींनीही सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन घेतलंय; आमदार अनिकेत तटकरेंचा पलटवार

भुसावळ शहर गुलालमय! डीजेच्या दणदणाटात नवदुर्गा मंडळांच्या मिरवणुका

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नवदुर्गा मंडळांच्या मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली.

गुलालाची उधळण करीत मंडळांनी शहराला गुलाबी रंगात रंगवले, तर डीजेच्या कर्कश आवाजाने परिसर दणाणून गेला.

शहरातील मिरवणुकीत ५५ मंडळे सहभागी, तर भुसावळ शहरात एकूण १३५ नवदुर्गा मंडळे आहेत.

या मिरवणुकांसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, डीजेच्या कर्कश आवाजाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Hingoli: लहान मुलांच्या भांडणावरून हिंगोली शहरात घरांची तोडफोड आणि हाणामारीची घटना

लहान मुलांच्या भांडणावरून हिंगोली शहरात घरांची तोडफोड आणि हाणामारीची घटना

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एनटीसी परिसरात घडली घटना

हिंगोली शहरातील एनटीसी परिसरातील बालाजी मंदिर परिसरात मध्यरात्री हा सगळा धक्कादायक मारहाणीचा प्रकार घडला

विशेष म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू असताना पोलिसांना मात्र याची कल्पना देखील नसल्याची माहिती पुढे आली आहे,

Washim: वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव

वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव

टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणूकीवर दगडफेक

मिरवणुकी दरम्यान, उधळलेला गुलाल विशिष्ट समाजातील व्यक्तीच्या घरावर गेल्याने दुर्गा मंडळ आणि काही तरुणांमध्ये झाली होती बाचाबाची

जमावाने काही दुचाकी आणि अन्य वाहनांची केली तोडफोड

दगडफेक करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठा जमाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com