Sunil Shelke News
Sunil Shelke News Saam tv
मुंबई/पुणे

Kishor Aware News:किशोर आवारे हत्या प्रकरणात आमदार सुनील शेळकेंचे नाव; कुटूंबियांच्या आरोपाने खळबळ

दिलीप कांबळे

Kishor Aware Death Case Update: पुण्यातील मावळमध्ये भर दिवसा मुळशी पॅटर्नचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. मावळमधील तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरुन गेला आहे.

या हत्ये प्रकरणी सध्या एक महत्वाची बातमी समोर येत असून किशोर आवारे यांच्या कुटूंबियांनी आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मावळमध्ये (Maval) जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा काल निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर पोलिस तपास करत असून रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्याच काम सुरू होते. (Latest Marathi News)

या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत असून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी या हत्येचा कट रचल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या कुटूंबियांनी केला आहे. याबाबत किशोर आवारे यांची आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीनुसार किशोर आवारे हत्येप्रकरणी श्याम निगडकर व त्यांचे तीन साथीदार यांच्यासह मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Pune News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Today's Marathi News Live : PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

Pankaja Munde: विजयासाठी योगदान द्या; सालगड्यासारखं काम करेल... पंकजा मुंडेंची मतदारांना साद

Baramati Lok Sabha News | Supriya Sule आणि Sunetra Pawar यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस, कारण काय?

Manish Sisodia: मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा, दिल्ली हायकोर्टाने मान्य केली मागणी

SCROLL FOR NEXT