Jalna Crime News: नवरा-बायकोच्या वादाचा भयानक अंत! पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास; तीन मुलं झाली पोरकी

Jalna Crime News: घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पतीनेही शेतात जाऊन दोरखंडाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam TV

Jalna Crime News: पत्नी-पत्नीचा वाद होणे ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असता. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे अशा काही घटना घडतात, की ज्यातून संसार उघड्यावर पडतो. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. (Breaking Marathi News)

या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पतीनेही शेतात जाऊन दोरखंडाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काळीज पिवटळून टाकणारी ही घटना घडत असताना त्यांची तीन मुले गावात खेळत होती. घटना समजताच त्यांनी हंबरडा फोडला.

Jalna Crime News
Akola Crime News: दारूने केला घात! रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापालाच संपवलं; मन सुन्न करणारी घटना

घटनेची माहिती मिळताच मंठा (Jalna Crime) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह मंठा प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहे. संजय अंकुश पवार आणि पत्नी संगीता संजय पवार, अशी मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे गावात संजय पवार आणि त्यांची पत्नी संगीता पवार हे आपल्या तीन मुलांसह राहतात. (Latest Marathi News)

संगीता आणि संजय यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. यातून संजय पवार याने घर बंद करून संगीताला मारहाण केली. शेजारच्यांनी संजयला समजवण्याचा प्रयत्न केला.

Jalna Crime News
Jalna Crime News: पती-पत्नीच्या वादात सोन्यासारख्या लेकराचा गेला बळी; भयानक घटनेनं जालना हादरलं

मात्र, त्याने कुणाचेही ऐकले नाही. दरम्यान, हा वाद (Crime News) इतका विकोपाला गेला की, संजयने पत्नी संगीताच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. या घटनेत संगीताचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्युनंतर संजय थेट शेतात गेला. तिथे त्याने एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

जेव्हा ही घटना घडली. तेव्हा त्यांची मुले गावात खेळत होती. आईसह-बापाचाही मृत्यू झाल्याचं कळताच, मुलांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी (Police) संजय आणि संगीता दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मंठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com