Jalna Crime News: पती-पत्नीच्या वादात सोन्यासारख्या लेकराचा गेला बळी; भयानक घटनेनं जालना हादरलं

Ambad Crime News: पतीसोबत वाद झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीला विष दिलं. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Jalna Anbad Taluka Crime News:
Jalna Anbad Taluka Crime News:Saam TV

Jalna Anbad Taluka Crime News: जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. पतीसोबत वाद झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीला विष दिलं. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्देवी अंत झाला. तर तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अंगावर काटा आणणारी ही घटना अंबड तालुक्यातील (Jalna News) शहागड येथे घडली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. श्रेया उर्फ चिऊ (वय ६ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात मनीषा पंडित यांच्या जबाबावरून कृष्णा पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Jalna Anbad Taluka Crime News:
Beed News: कारखान्याने ऊसाचे पैसे थकवले, मुलीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं; शेतकऱ्याने व्हिडीओ बनवला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ शहागड येथील रहिवाशी असलेल्या कृष्णा पंडित हा अंबड शहरात कॉम्प्युटर ऑपरेटरचा व्यवसाय करतो. तर त्यांची पत्नी मनीषा पंडित एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत कार्यरत आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते.  (Latest Marathi News)

सोमवारी सायंकाळी पती-पत्नी दोघेही घरी कामावरून परतल्यानंतर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कृष्णा पंडित यांने आपल्या पत्नीला जबर मारहाण केली. या मारहाणीत (Crime News) मनीषा जखमी झाली. तिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

Jalna Anbad Taluka Crime News:
Goa Crime News: पती नव्हे हैवान! मित्राला घरी बोलावून पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

त्यानंतर मंगळवारी कृष्णा पंडित यांने सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या ६ वर्षाच्या श्रेयाला घेऊन पैठण फाट्यावरील त्यांच्या नातेवाईकाची वीटभट्टी गाठली. वीट भट्टीवर त्यांने श्रेयाला विषारी औषध दिले. त्यानंतर स्वत: घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही गेवराई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरूवारी ६ वर्षाच्या श्रेयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं शहागड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मनीषा पंडित यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) कृष्णा पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com