Beed News: कारखान्याने ऊसाचे पैसे थकवले, मुलीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं; शेतकऱ्याने व्हिडीओ बनवला अन्...

Beed Farmer News: मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून ४० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
Beed Farmer News
Beed Farmer NewsSaam TV

Beed Farmer News: कारखान्यात ऊस घालूनही बिल मिळालं नाही. अनेक वेळा मागणी केली, पण मात्र कारखाना दुर्लक्ष करतोय. मग मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून ४० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक बाब म्हणजे, विष प्राशन केल्यानंतर शेतकऱ्याने व्हिडीओही बनवला. या व्हिडीओतून त्याने आपली व्यथा मांडली. (Breaking Marathi News)

Beed Farmer News
Goa Crime News: पती नव्हे हैवान! मित्राला घरी बोलावून पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावात ही भयानक घटना घडली तात्यासाहेब हरिभाऊ पौळ (वय ४० वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृत तात्यासाहेब पौळ यांनी अहमदनगरच्या पियुष शुगर लिमिटेड वाळकी या कारखान्याला आपला ऊस घातला होता. (Latest Marathi News)

या ऊसाचे बील मिळावे यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून तात्यासाहेब पाठपुरावा करत होते. मात्र, पाठपुरावा करूनही बिल मिळत नसल्याने, आता मुलीच्या लग्नाला घेतले कर्ज कसं फेडायचं ? या विवंचनेत तात्यासाहेब यांनी दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केलं.

त्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या का करतोय? याचा व्हिडिओ बनवला. मात्र उपचारादरम्यान आज बीडच्या जिल्हा रुग्णालयात तात्यासाहेब यांची प्राणज्योत मालवली.

Beed Farmer News
Bhayandar Crime News: "हॅलो, मी डॉक्टरांची पत्नी बोलतेय..." महिलेचा आवाज काढून सोनाराला गंडवलं; असा अडकला जाळ्यात

दरम्यान, माझ्या मित्राकडे अवघी 2 एक्कर शेती आहे. त्याच शेतीवर तात्यासाहेब पौळ हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. यादरम्यान त्याच्या मुलींचे लग्न झाले. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज कसं फेडावं असा प्रश्न त्याच्यापुढं होता, असं तात्यासाहेब यांचे मित्र काळे यांनी सांगितलं आहे.

इतकंच नाही तर, तात्यासाहेब यांनी बिल मिळावं यासाठी अनेकवेळा चकरा मारल्या होत्या. तरी सुद्धा कारखान्याने बिल दिलं नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि कुटुंबियांना कारखान्याने ५० लाख रुपयांची मदत करावी. अशी मागणी सुद्धा काळे यांनी केली आहे.

तात्यासाहेब यांच्या मृत्युने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सत्तेसाठी लाचार होऊन बसलेल्या मंत्र्यांना आतातरी जाग येणार का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com