Worli Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

Worli: वरळीत अग्नितांडव! शो रूमला भीषण आग, आग विझवताना अग्निशमन दलाचा जवान जखमी

Worli Bharat Bazaar Fire news: वरळीतील गांधी नगरमधील भारत बाजार परिसरातील मार्शल शोरूमच्या गोदामात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे ४.३० वाजता लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं.

Bhagyashree Kamble

मुंबईच्या वरळीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. गांधी नगरमधील भारत बाजार परिसरातील मार्शल शोरूमच्या गोदामाला भीषण आग लागली होती. ही आग पहाटे साडेचारच्या सुमारास लागल्याची माहिती आहे. या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. आग विझवताना मात्र, दुर्घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला असून, यात लाखोंचं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १७ मे रोजी पहाटे साडेचार- पाच वाजेच्या सुमारास शोरूमला आग लागली. भारत बाजार परिसरातील गोदामात अचानक आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. सकाळी ५ वाजता या आगीला 'लेव्हल १' ची आग म्हणून जाहीर करण्यात आलं. सुमारे ९०० चौरस फूट क्षेत्रफळात ही आग पसरली होती.

ही आग पसरताच काही क्षणात धुराचे लोट पाहायला मिळाले. या गोदामात विद्युत यंत्रणा, कागद, गिफ्ट बॉक्सेस, सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी साहित्य, कपडे, संगणक, लाकडी दरवाजे यांसारख्या वस्तू साठवलेल्या होत्या. सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. सकाळी ७.१२ मिनिटांनी आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

आग विझवताना अग्निशमन दलातील अजिंद्र गणपत सावंत या जवानाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT