Crime: संतापजनक! १२ वर्षीय मुलीला शाळेत नेलं अन् मादक पेय पाजलं; गुंगी येताच सामूहिक अत्याचार, परिसरात खळबळ

Physical assault by 5 people: एका १२ वर्षीय मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
Crime
CrimeSaam Tv
Published On

आता एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर येत आहे. एका १२ वर्षीय मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. ही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी मुलीला आमिष दाखवून डायमंड ज्युनियर स्कूलमध्ये नेलं, नंतर तिला कोल्ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील एका शाळेच्या इमारतीत घडली. डायमंड ज्युनियर स्कूलमध्ये आधी १२ वर्षांच्या मुलीला ५ जणांनी नेलं. त्यानंतर आरोपींनी तिला कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून प्यायला दिलं. नंतर ५ जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

Crime
Vaishnavi hagavne: 'वैष्णवीचा नवरा मला मारायचा, म्हणून माझे हात..', वैष्णवीच्या मोठ्या जाऊ बाईंकडून गौप्यस्फोट

बलात्कारानंतर, आरोपींनी पीडितेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एका शेजाऱ्याने व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि पीडितेच्या आईला कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली, त्यानंतर तिच्या आईने २० मे रोजी या प्रकरणात पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

Crime
Dhule: शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या सहाय्यकाच्या नावावर मोठं घबाड; गेस्ट हाऊसचं कुलूप तोडताच एक कोटी ८४ लाखांची रोकड जप्त

पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, ही घटना ८ मे रोजी संध्याकाळी घडली. पाच मुलांनी मिळून मुलीला शाळेच्या इमारतीत नेले आणि हे कृत्य केले. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे निरीक्षक मनीष सक्सेना म्हणाले की, पाचही आरोपी पीडितेच्या परिसरात राहतात. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना तातडीने ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com