संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Fire Breaks Out At 'Anupama' Set In Mumbai Film City : मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटीतील 'अनुपमा' मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाल्याने निर्मात्याचे मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही. (Anupamaa serial fire news update)
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजल्यापासूनच गोरेगावमधील फिल्मसीटीमधून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले. आग इतक्या झपाट्याने पसरली की, अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण सेट खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.
या आगीमुळे 'अनुपमा' मालिकेच्या चित्रीकरणाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र, ही घटना मालिकेच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. पोलिस आणि अग्निशमन दल याबाबत पुढील तपास करत आहे.
सकाळी सात वाजता चित्रीकरण सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या फक्त दोन तास आधी, आगीने सेट पूर्णपणे जळून खाक झाला. आग लागली तेव्हा दिवसाच्या चित्रीकरणाची तयारी आधीच सुरू होती. घटनेच्या वेळी, अनेक कामगार आणि क्रू मेंबर्स सेटवर उपस्थित होते. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तथापि, जर आग चित्रीकरण सुरू झाल्यावर लागली असती तर परिस्थिती भयानक बनली असती, ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती.
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे पत्र महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. गुप्ता यांनी पुढे फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबईच्या कामगार आयुक्तांना सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना जबाबदार धरून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. एआयसीडब्ल्यूएचा आरोप आहे की त्यांच्या संगनमताने आणि जाणूनबुजून निष्काळजीपणामुळे, निर्मात्यांना अनिवार्य अग्निसुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास भाग पाडले जात नाही, ज्यामुळे हजारो कामगारांचे जीवन गंभीर धोक्यात आले आहे.
AICWA ने निर्माते, प्रॉडक्शन हाऊस, टेलिव्हिजन चॅनल तसेच फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांच्याविरुद्ध फौजदारी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली असून आग निर्मात्यांनी जाणूनबुजून लावली होती की चॅनेलने बेकायदेशीरपणे विमा दावा करण्यासाठी लावली याचीही कसून चौकशी झाली पाहिजे असेही गुप्ता यांनी म्हटले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.