Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

Mississippi Mass Shooting : अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या संशयिताच्या हेतू किंवा ओळखीबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाहीये.
Mississippi Mass Shooting :
Mississippi shaken after a horrific mass shooting incident claiming six lives; police intensify investigation.
Published On
Summary
  • मिसिसिपीमध्ये अंधाधुंद गोळीबार झल्याची घटना घडलीय.

  • तीन ठिकाणी झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झालाय.

  • पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेने मिसिसिपी शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा एका व्यक्तीने गोळीबार केला, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

स्थानिक माध्यमांनुसार, पोलिस चौकीने मृतांचा विशिष्ट आकडा दिलेला नाही, परंतु WTVA ने सांगितले की सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या संशयिताच्या हेतू किंवा ओळखीबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाहीये. पोलिसांचे एक पथक आरोपीची चौकशी करत आहे.

या गोळीबारीच्या घटनेनंतर मिसिसिपी पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गोळीबारात जखमी झालेल्यांची नेमकी संख्या किती या आकडा समोर आला नाहीये. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती लवकरच दिली जाईल. दरम्यान सुमारे तीन महिन्यांपूर्वी १० ऑक्टोबर २०२५ रोजी अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. फुटबॉल सामना संपल्यानंतर रात्री उशिरा एका हायस्कूलमध्ये मोठा गोळीबार झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com