
पुणे -
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय उस्मान भाई तांबोळी यांनी सोडली पक्षाची साथ रा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश
जालना -
जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड कचऱ्यात
जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात आधारकार्ड , पॅनकार्ड आणि मतदान कार्ड सापडले
जालना शहरासह काही ग्रामीण भागातील आधार कार्ड आणि मतदान कार्ड असल्याची माहिती
डच्या वडवणी तालुक्यातील गणेश डोंगरे यांच्या पत्नी या रील्स काढत असतानाच अंगावर उसाची ट्रॉली पलटी होऊन मृत्यू झाला होता त्यामुळे खूप कुटुंब अडचणी सापडले होते मात्र ऊसतोड कामगार संघटनांच्या मदतीने थेट कारखान्याच्या गव्हाणी मध्ये उतरून आंदोलन केले या आंदोलनाला 15 तासानंतर यश आले व गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना कारखान्याकडून 21 लाखाची आर्थिक मदत व 04 लाख रुपये घेतलेली उचल माफ करण्यात आली याचे सर्व श्रेय ऊसतोड कामगार संघटनांनी केलेल्या आंदोलनाला यश आल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेला हल्ला हा राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. काही राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अवैध धंदे करणाऱ्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुण्यातील कोथरूड भागात अजित पवारांचा रोड शो
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे भाजपला थेट आव्हान
अजित पवार यांच्या कोथरूड, बावधन भागातून रोड शो ला मोठी गर्दी
प्रभाग १० बावधन भुसारी कॉलनी मधून भाजप समोर अजित पवारांच्या राष्ट्रवादी चे आव्हान
कोल्हापूर महानगर पालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. यातच आज प्रचाराचा सुपर संडे पाहायला मिळतोय. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरूच ठेवलाय. आज रविवार असल्याने सुट्टीचा मुहूर्त साधत खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या 81 वार्डमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून घर टू घर जाण्याचा प्रयत्न केलाय.
शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?
आनंदवली परिसरात अज्ञाताने मंतरलेले तांदूळ फेकल्याचा आरोप
अनेक भागात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आढळून आले हळद-कुंकू लावलेले तांदूळ
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची ऐनवेळी युती तुटली व दोन्ही पक्ष हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 67 उमेदवार रिंगणात आहे तर भाजपचे देखील 74 उमेदवार रिंगणात आहे, त्यामुळे शिंदे सेनेचे मंत्री नेते अमरावतीमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून ठाण मांडून बसले आहे
कोकणातील ओल्या काजूगरांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता 'वेंगुर्ले १० एमबी' हे वाण विकसित करण्यात आले आहे. काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी १५ वर्षांच्या संशोधनानंतर 'वेंगुर्ले १० एमबी' हे वाण निर्माण केले आहे. याची कलमे लवकरच शेतकऱ्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे उपलब्ध होतील. या वाणाच्या काजू बी मधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्याने यासाठी कमी खर्च येतो अशी माहिती संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी दिली आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 ड मधून रितेश नेभनानि हे अपक्ष निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी भाजपा व युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीमध्ये ही जागा युवा स्वाभिमान पक्षाला दिली होती.मात्र काल या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाची युती तोडून अपक्ष उमेदवार रितेश नेभणानि यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे...
- बंडखोर अलका अहिरे आणि त्यांचे पती कैलास अहिरे यांची पक्षातून हकालपट्टी
- तिकीट वाटपावरून नाराज होऊन बंडखोरी करणाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांचा कडक इशारा
- सिडकोतील प्रभाग क्र. २६ मधून माघार घेण्यास नकार दिल्याने आणि पक्षादेश न जुमानल्याने अहिरे दाम्पत्यावर कारवाई
- अलका अहिरे यांना पक्षाचे चिन्ह मिळाले आहे, तर अधिकृत उमेदवार पुष्पावती पवार यांचा एबी फॉर्म उशिरा दाखल झाल्याने भाजप पुरस्कृत अपक्ष लढण्याची वेळ
- भाजपच चिन्ह अहिरे यांच्याकडे असले तरी भाजपने पुष्पावती पवार यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून केलंय पुरस्कृत
- या कारवाईमुळे इतर बंडखोरांवरही कारवाईची टांगती तलवार कायम
- भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे मुख्यमंत्र्यांच्या सभेत मोठे विधान
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोलापूर महापालिकेच्या प्रचारसभेत बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांचे मोठे विधान
- 892 कोटीच्या योजनेच्या माध्यमातून रोज पाणी पुरवठा केला नाही तर मी पुढील आमदारकीला मत मागायला येणार नाही.
- मी माझ्या लोकांना रोज पाणी देऊ शकत नसेल तर मला अशी आमदारकी नको.
- देवाला साक्षी ठेवून मी सांगतो, पाणी दिले नाही तर माझ्या आमदारकीचा त्याग करेन हा शब्द देतो.
घरावर झालेल्या दगडफेकीत खिळक्यांचे काचांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या सह गाडी जाळण्याच्या देखील प्रयत्न....
नंदुरबार नगर परिषदेवर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून दुपारी झालेल्या किरकोळ वादानंतर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी घरावर केले दगडफेक....
धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढायला लागला आहे, आज धुळ्यामध्ये 6°© इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता, परंतु आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात धुळ्यात वाढल्याच दिसून येत आहे. अचानक पुन्हा वाढलेल्या या थंडीमुळे धुळेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे, या वाढत्या थंडीचा परिणाम आता पुन्हा एकदा मानवी जनजीवनावर दिसून येत आहे.
पुढील काही दिवस थंडीचा जोर अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार आहे .. आज शेवटी शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू यांचा यलगार मुंबईकरांना पाहिला मिळणार आहे .. शिवशक्ती या सभेला नाव देण्यात आलं आहे … मुंबईची ही सर्वात महत्त्वाची ही सभा आहे … आज संध्याकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार या कडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
आज ही मुंबईची एकमेव संयुक्त सभा होऊ शकते
आज मंचावर २२७ मुंबईचे ठाकरे उमेदवार एकत्र बसणार आहेत ..
मनसे आणि शिवसेनेचे कार्यक्रते एकत्र शिवाजी पार्कवर पाहिला मिळतील
युती झाल्यानंतर पहिल्यांदा ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) च्या वतीने नागपुरातील 115 काँग्रेस उमेदवारांना समर्थन जाहीर
- यापूर्वी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा यांनीही काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे
- मतांचे विभाजन होऊ नये यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे
- तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले आहे
- नागपूर मनपा निवडणुकीत भलेही महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात नसले तरीही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आहे
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागपुरातील 21 उमेदवारांना जाहीर पाठिंबा घोषित केलाय
- तर ठाकरेंच्या शिवसेनेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 26 उमेदवारांना समर्थनाचे पत्र दिले आहे
परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये विविध भागांमधील मूलभूत सुविधा असतील इतर मागण्यांसाठी नागरिक हे मतदानावर बहिष्कार टाकताना दिसत आहेत परभणीतील संत गाडगेबाबा नगर येथील रहिवाशांनी मागच्या चाळीस वर्षापासून राहत असलेल्या झोपडपट्टीचे नियमितीकरण केले गेले नाही तसेच कुठल्याही सुविधा मिळाल्या नाही त्यामुळे या ठिकाणी मतदानावर बहिष्कारचा निर्णय टाकत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मागच्या ३ दिवसांपासून संत गाडगेबाबा नगरवासीय हे आंदोलन करत आहेत या आंदोलनाला काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली या सर्वांची चर्चा करून त्यांना आश्वासनही दिले मात्र या आश्वासनानंतरही या आंदोलकांनी आपल आंदोलन कायम ठेवल आहे
उत्तरेकडील थंड वारे आता दिवसाही यवतमाळ जिल्ह्यात थेट येत असल्याने तापमानात मोठा उलट फेर निर्माण झाला आहे 30 अंशापर्यंत पोहोचलेले दिवसाचे तापमान लक्षणीय घटले असून पारा 25.4 अंशावर आला आहे हे विदर्भातील दिवसाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद असून दुसरीकडे रात्रीचे तापमान हे सतत कमी होत आहे, सध्या 9.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
भाजपा नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात रात्री भाजपासाठी दोन प्रचारसभा घेतल्यात. पहिली सभा जुने शहरातील शिवाजीनगर भागात झालीय. तर दुसरी सभा देशमुखफैलातील शिवाजी पार्क भागात झालीय. या दोन्ही सभेत त्यांनी मतदारांना अकोल्यात भाजपला सत्ता देण्याचं आवाहन केलंय. या सभेनंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
प्रवाशी वाहून नेणाऱ्या बर्निंग वाहनाचा थरार पाहायला मिळालाय.. अकोला हैदराबाद महामार्गवरील मालेगावहून पातूरकडे येत असलेल्या या चालत्या वाहनाने अचानक पेट घेतलाय.. रात्री अकोल्यातल्या बोरखा परिसरात ही घटना घडलीय.. प्राप्त माहितीनुसार, या वाहनात चालकासह चार प्रवासी होते, ते मालेगावहून पातूरकडे जात होते. वाहनचालकाला वाहनातं अचानक उष्णता जाणवू लागली, आणि क्षणातच वाहनातून धूर निघू लागला. लागलीच वाहन चालकांना सतर्कता दाखवत वाहन थांबवले.. आणि सर्व प्रवासी सुखरूपपणे गाडीतून बाहेर पडले. काही क्षणातचं वाहनाला मोठी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. अग्निशमन दलं घटनास्थळी दाखल झाले. थोड्या वेळातचं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, वाहनाचं मोठं नुकसान झालं.
अकोला जिल्ह्यातील गोर्धा तेल्हारा रोडवर बांधकाम विभागातील अधिकारी आणि शासकीय ठेकेदारांच्या चारचाकी वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. अश्विन गजानन कोरडे असं या 35 वर्षीय मृतकाचं नाव आहेय. ते तेल्हारा तालूक्यातील हिंगणीचे रहिवासी आहेय. हिंगणी येथुन तेल्हाराकडे जात असतांना हा अपघात झालाय. याप्रकरणी अकोल्यातील हिवरखेड पोलीस अधिक तपास करतायेत. याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी चारचाकी वाहनातील अधिकारी आणि ठेकादारांवर बेजबाबदारपणाचा आरोप लावलाय. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करतायेत...
राज्यात 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान होतंये. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी अकोल्यातील पातूर रोडवरील प्रभात किड्स स्कूलने अनोखा उपक्रम राबविलाय. यासाठी शाळेने झालेल्या पालकसभेचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. शाळेत पालक सभेसाठी आलेल्या पालकांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पथनाट्यातून मतदानाचं आवाहन केलंय. या विद्यार्थ्यानी पालकांना मतदान करणे सक्षम लोकशाहीसाठी कसं आवश्यक आहेये, हे पथनाट्यातून सांगितलंय. यासोबतच शाळेनं यावेळी मतदान करणार असा एक सेल्फी पॉईंटही तयार केला होताय. शाळेत आलेल्या पालकांनी मतदान करण्याचं वचन पथनाट्य सादर करणार्या विद्यार्थ्यांना दिलंय. प्रभात किड्स स्कूलच्या या उपक्रमाचं कौतूक होतंये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.