Bhaiyyaji Joshi Saam tv
मुंबई/पुणे

Marathi language Row : RSSच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्याने नाव वाद; भय्याजींनी नाकारली मुंबईत मराठी?

Bhaiyyaji Joshi : मुंबईत पुन्हा मराठीवरून वाद पेटलाय...मात्र यावेळी मराठमोळ्या भैयांजींमुळे वाद झालाय...काय आहे हा वाद ? पाहूयात विशेष रिपोर्ट....

Snehil Shivaji

मुंबईतच मायबोली मराठी संकटात सापडलीय. होय आजवर अनेकांनी मराठीचा अपमान केल्याचं आपण पाहिलंय. मात्र भिंवडीत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांचा संताप झालाय.

मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं म्हणत भैय्याजी जोशींनी मराठी मनाच्या जखमेवर मीठ चोळल्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. कारण याच घाटकोपरमध्ये मराठी माणसाला गुजरातींनी घर नाकारल्याची घटना वर्षभरापुर्वी घडली होती तर याच घाटकोपरमध्ये गुजरातीत दुकानाच्या पाट्या लावल्यानं मराठी आणि गुजराती वादाची ठिणगी पडली होती आणि आता भैय्याजींनी केलेल्या या वक्तव्यानं थंड झालेल्या या वादात तेल ओतण्यात आलं आणि त्याचा भडका उडालाय...या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी थेट भैय्याजींना इशारा दिलाय..

भय्याजींवर राज ठाकरे संतापले

मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही जोशीबुवांनी लक्षात ठेवावं

राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणे नाही

काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात

MMRमधील विकास, त्यामागील राजकीय हेतू न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही

भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार?

एवढंच नाही तर राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही भय्याजी जोशींचा अनाजीपंत असा उल्लेख केलाय...

संघाचे सरकार्यवाह भैय्याजीं जोशींवर आता चौफर टिकेची झोड उठल्यानं आणि विरोधकांनी थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर भय्याजी जोशींनी सारवासारव केली.

राजकीय वातावरण तापल्यानंतर भय्याजींनी आपल्याच वक्तव्यावरुन घुमजाव केलं. मुंबईत मराठीवर घाव घालणारे अनेक परप्रांतिय आपण आजवर पाहिलेत. ज्यांनी मराठीला नाकारत मराठी बोलायला नकार दिला किंवा मुंबईत मराठी ऐवजी गुजराती आणि हिंदीचा आग्रह करत मराठीचा अपमान केला.

अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीचा हा अपमान थांबणार तरी कधी की कायम राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आमच्या मराठीला अशा अवमानाला सामोरं जावं लागणार असा संतप्त सवाल मराठी जनांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT