Saam Tv
घाटकोपर हे खाण्याच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं.
आपण हॉटेल्समध्ये विविध प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो.
मात्र हॉटेलचे दर प्रत्येकाला परवडतीलच असे नाही. त्यात नविन पदार्थ चवीला चांगला नसेल तर ते अन्न वाया जातं.
याचाच विचार करून आम्ही तुमच्यासाठी १०० रुपयाच्या आत असलेले विविध पदार्थ मिळण्याचे ठिकाण शोधले आहे.
घाटकोपर हे ठिकाण प्रत्येक मुंबईकरांच्या परिचयाचे ठिकाण आहे.
हे ठिकाण खरेदीसाठी आणि विशेष: खाऊ गल्लीच्या चवीष्ठ स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे.
तुम्ही घाटकोपरमध्ये रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर असलेल्या खाऊ गल्लीत जाऊन विविध पदार्थांची कमीत कमी पैशात चव घेऊ शकता.
घाटकोपरमध्ये भाऊ वडा पाव, दही ढोकळा, पाणी पुरी चाट, मिल्क शेक, दाबेली, आईस्क्रीम कोन, पाव भाजी, थंड पाणी पुरी, फालुदा, मलई असे टेस्टी यम्मी पदार्थ खाऊ शकता.