Voter List name in other langauge Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics : मुंबईत मतदारांची नावे गुजराती, बंगाली आणि तामिळ भाषेत; मराठीला डावलल्याने मनसे आक्रमक

Mumbai Political News : मुंबईत मतदारांची नावे गुजराती, बंगाली आणि तामिळ भाषेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

चारकोप मतदारसंघात मतदारांची नावे गुजराती, बंगाली, ओडिया आणि तामिळ भाषेत

मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक मोर्चा

मनसेकडून मराठी भाषेतील मतदारयाद्या त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी

निवडणुकीपूर्वी भाषिक मुद्द्यावरून मुंबईचं राजकीय वातावरण तापलं

संजय गडदे, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे मुंबईसह राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारायादीतील घोळ देखील समोर येत आहे. मुंबईत काही ठिकाणी मतदारांची दुबार नावे आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे पदाधिकारी मतदारयादीतील घोळ समोर आणत आहेत. आता मनसे पदाधिकाऱ्यांनी मतदारयादीतून मराठी भाषेलाच डावलल्याचा प्रकार समोर आणला आहे. या प्रकारामुळे मनसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबईतील चारकोप विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत गुजराती, बंगाली, ओडिया भाषेत मतदारांची नावे आढळली आहे. या यादीत मराठीला डावलल्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. इतर भाषेत असलेल्या मतदारयाद्या मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आणल्या.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदारयाद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचे काम मनसे पक्षाकडून सुरू आहे. चारकोप मतदारसंघात सर्वाधिक घोळ मतदारयाद्यांमध्ये आढळून आला आहे. यासोबतच अनेक मतदारांची नावे मराठी ऐवजी गुजराती, बंगाली, ओडिया आणि तामिळ भाषेत देखील आढळून आल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याच मुद्द्यावर आक्रमक होत चारकोप विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढला.

यावेळी इतर भाषेत छापण्यात आलेल्या मतदार याद्या दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून या याद्या त्वरित मराठीमध्ये कराव्यात, असा इशारा दिला. वेळेत यात सुधारणा झाली नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही साळवी यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

Maharashtra Live News Update : मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO

SCROLL FOR NEXT