Manoj jarange Patil Speech Live Update big Announcement on Maratha Reservation Protest Mumbai Morcha Saamtv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून सर्व मागण्या मान्य?; मनोज जरांगे २ वाजता मोठी घोषणा करणार

Maratha Reservation Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.

Gangappa Pujari

Manoj jarange Patil Press Conference:

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. लाखो मराठा बांधवांसह राजधानी मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानात जाण्यावर ठाम होते. मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आता जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेतून जरांगे पाटील यांनी (Manoj jarange Patil Sabha Vashi)

मराठा आंदोलनाला मोठं यश...

सरकारसोबत आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे शिष्टमंडळ तसेच वकिलांसोबतही चर्चा केली. या चर्चेनंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी नगर चौकात सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरील सरकारने काढलेला जीआर वाचून (Maratha Reservation GR) दाखवला.

गैरसमज नको, २ वाजता भूमिका स्पष्ट करु...

"आपल्याला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने काही कागदपत्रे दिली आहेत, ते वाचून दाखवणार आहे. झालेल्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण मोकळं माघारी जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वांना आवाज गेला पाहिजे, गैरसमज नको म्हणत साऊंड सिस्टिमची व्यवस्था झाल्यानंतर २ वाजता याबाबत जाहीर सभेत घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी सांगितले आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) लाखो मराठा बांधवांसह अंतरवाली सराटीमधून २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सरकारदरबारी हालचाली सुरू झाल्या होत्या. जरांगे पाटील यांच्याशी वारंवार सरकारकडून चर्चा करत मुंबईमध्ये उपोषण न करण्याची विनंती केली जात होती. अखेर आता जरांगे पाटील यांच्या या लढ्याला मोठे यश आल्याचे दिसत आहे. सरकारसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सभा घेत मराठा बांधवांना सरकारसोबत झालेल्या चर्चेबाबत स्पष्टिकरण दिले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT