Manoj Jarange Saam tv news
मुंबई/पुणे

Manoj Jarange : मराठा आंदोलक मुंबईहून गावाकडे परतले अन् पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल

Mumbai police register 9 FIRs against Maratha protesters : मराठा आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी ९ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, जे जे मार्ग, कुलाबा, एम आर ए मार्ग आणि डोंगरी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • मुंबईत मराठा आंदोलनानंतर पोलिसांनी ९ गुन्हे दाखल केले.

  • अज्ञात आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव, वाहतूक अडवणे व नुकसानप्रकरणी गुन्हे.

  • आझाद मैदानासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल झाले.

  • मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतल्यानंतर पोलिसांची कारवाई सुरू झाली.

Mumbai police file FIRs against Maratha protesters after quota agitation : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यातील मराठ्यांने मुंबईमध्ये पाच दिवस उपोषण, आंदोलन केले. मंगळवारी सायंकाळी सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण माघारी घेतलं अन् मराठ्यांना मुंबई सोडण्याचे आवाहन केले. मराठे मुंबईतून निघाल्यानंतर पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल केले जात आहे. अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत. बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, दमदाटी करणं, याप्रकरणी पोलिासांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मरिन ड्राईव्ह आणि परिसरात बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, दमदाटी केल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनानंतर मराठा मुंबईतून निघून गेल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ ते १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेक. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक पोलिसांच्या कारवाईवर काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये शेकडो गाड्या घेऊन आले होते. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्याने मराठा बांधवांनी CSMT आणि आजुबाजूच्या परिसरात आश्रय घेतला होता. अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, हायकोर्ट, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी भटकंती केली होती. रस्त्यावर डान्स, कब्बडी, घोषणाबाजी करण्यात आली होती.

मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून ९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. झोन १ च्या हद्दीतीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आझाद मैदान पोलीस ठाण्यात ३, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २, जे जे मार्ग, कुलाबा, एम आर ए मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यातही प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणे अशी कृत्ये करणाऱ्या अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लघंन करत, कायदा हातात घेतल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूकीस अडथळा करणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान यासह मारहाण या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून अज्ञात व्यक्तींवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

Maharashtra Dam : राज्यातील धरणांत ८५ टक्के साठा, मराठवाडा ते कोकण, कुठे किती जलसाठा?

भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

SCROLL FOR NEXT