Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : लसूण चोरीच्या संशयावरुन ४६ वर्षीय व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या, बोरिवलीतील धक्कादायक घटना

Shopkeeper Beats man to Death : पंकज मंडल बोरिवली भाजी मंडईत भाजीची पोती लोड करणे आणि उतरवणे अशी कामं करत होता. घनश्याम खाकरोडिया या लसूण विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai Crime News :

लसूण चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना मुंबईत घडली आहे. बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये ही घटना घडली आहे. पाच महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याचा रागातून ४६ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. पंकज मंडल असे मृत व्यक्तीचं नाव आहे.

या प्रकरणी घनश्याम खाकरोडिया या लसून विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. पंकज मंडल बोरिवली भाजी मंडईत भाजीची पोती लोड करणे आणि उतरवणे अशी कामं करत होता. मार्केट परिसरातच 500 मीटरवर त्याचा मृतदेह आढळला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंडल गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याचा संशय घनश्याम खाकरोडियाला होता. मात्र त्यांच्याकडे ठोस पुरावे नव्हते. मात्र खाकरोडिया आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी 6400 रुपये किमतीची 20 किलो लसूण असलेली पोती चोरल्याप्रकरणी मंडलला पकडले. (Latest Marathi News)

बुधवारी रात्री या सर्वांनी मंडलकडे याबाबत चौकशी केली. मंडलने चोरीची कबुली दिली आणि लसूण चोरीचे पैसे देण्याचंही मान्य केलं. मात्र दुकानमालकाने मंडलला रागात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बेदम मारहाणीनंतर अर्धमेला अवस्थेत मंडल खाली कोसळला. त्यानंतर घनश्यान आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून निघून गेला. तेथे उपस्थित इतर लोक मंडलच्या मदतीला आले आणि पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली.

मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मंडल त्यांना मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT