Mumbai Crime News: मुंबईच्या रस्त्यावर खतरनाक थरार! पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या

Mumbai News: मुंबईच्या खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्विगी बॉयचा मोबाईल हिसकावून दुचाकी वरून पळ काढणाऱ्या दोन मोबाईल चोरांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे.
Khar Police Station
Khar Police StationSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Khar Police Station:

मुंबईच्या खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्विगी बॉयचा मोबाईल हिसकावून दुचाकी वरून पळ काढणाऱ्या दोन मोबाईल चोरांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

विशाल रमेश शुक्ला व विशाल सुरेश शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. हे दोघेही सराईत चोरटे असून या दोघांवर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. खार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भीमराव धापटे यांनी दुचाकीवरून या चोरांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने या दोघांना अटक केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Khar Police Station
Mumbai Viral Video: लग्नाचं दिलं वचन अन् केला दगा! तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai Crime News) खार पश्चिमेकडील विविध हॉटेलमधील जेवण घरपोच करणाऱ्या स्वीगी बॉय चां फोन दुचाकी वरून आलेल्या तरुणांनी हिसकावून घ्यायला त्या स्विगी बॉय ने याची माहिती रात्रपाळी वर व्यस्त घालत असलेल्या खार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे यांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता धापटे यांनी दुचाकी वरून त्या चोरांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

धापटे यांनी फिल्मी स्टाईलने दुचाकी वरून पळून जाणाऱ्या त्या दोन्ही मोबाईल चोरांना आपली गाडी आडवी लावून रोखले. यानंतर पोलीस ठाण्यात त्यांना आणून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

Khar Police Station
Beed Viral Video: बीडमधील शाळेतील शिक्षकांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, शाळेच्या आवारात केलं अश्लील कृत्य

विदाऊट नंबर प्लेट कारवाईचा बहाना करून चोरांना पोलीस ठाण्यात आणले

स्विगी बॉयचा मोबाईल चोरून दुचाकी वरून पळून जाणाऱ्या त्या चोरांच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. धापटे यांनी त्यात चोरांचा पाठलाग करून गाडी आडवी लावून रोखले. तुम्ही गाडीला नंबर प्लेट न लावता गाडी चालवत असल्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागणार असून तो भरण्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे सांगून धापटे यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्याचवेळी त्या दोन चोरांपैकी एका चोराने चोरीचा मोबाईल लपून ठेवला. लपवून ठेवलेला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला व गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील हस्तगत केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com