Rajkot Fort Shivaji Maharaj Statue Saam Tv
मुंबई/पुणे

Shivaji Maharaj Statue: कमकुवत फ्रेम, गंज अन् वेल्डिंगमुळे पुतळा कोसळला; राजकोट प्रकरणावर चौकशी समितीचा अहवाल समोर

Priya More

Latest Marathi News Updates: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या चौकशी समितीने १६ पानी अहवाल शासनाकडे सादर केला. गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळल्याचे या अहवालामध्य नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलिस चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा मागच्या महिन्यात कोसळला होता. या घटनेवरून राजकारण प्रचंड तापले होते. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समितीची स्थापन केली होती. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल ३० दिवसांमध्ये सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या घटनेचा १६ पानांचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेनंतर एका महिन्यानंतर चौकशी समितीने १६ पानांचा अहवाल सरकारकडे सादर केला. या अहवालामध्ये कमकुवत फ्रेम आणि पुतळ्याच्या आतमध्ये गंज चढल्यामुळे तो कोसळल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत पुतळ्याला चुकीच्या ठिकाणी वेल्डिंग केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचे देखील अहवालामध्ये सांगितले आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलिस चौकशी होणार आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन घोटाळा झाल्याचं आरोप केले होते. पुरावे पोलिसांकडे सादर करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. तर या अहवालावर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'अर्थात यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. एवढे मोठे दैवत आहे आणि त्याचं वेल्डिंग नीट झाले नाही यात भ्रष्टाचार झाला.' असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT