Malshej Ghat Traffic Update Saam Tv
मुंबई/पुणे

Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचला, वाहतूक पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Malshej Ghat Traffic Update: माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. माळशेज घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Priya More
  • माळशेज घाटातील रस्ता खचला

  • रस्ता खचल्याने माळशेज घाटातील वाहतूक ठप्प

  • दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यात आली

  • जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे केले आवाहन

माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुसळधार पावसामुळे माळशेज घाटामध्ये रस्ता खचल्याची घटना घडली. या घटनेनंतर माळशेज घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण -माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६१ मौजे करंजाळे गावाच्या हद्दीमध्ये रस्ता खचला. महामार्गावर रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता माळशेज घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग. त्यामुळे माळशेज घाटातील दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने अपघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला.

माळशेज घाटातून दररोज पर्यटक, प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. रस्ता आणखी खचण्याची शक्यता आणि संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन माळशेज घाट मार्गे येणारी आणि जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. आळेफाटा-नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव (एमआयडीसी)-लोणावळा खोपोली-मुंबई या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite : अमरावतीत खळबळ! सर्प दंशाने ७ जणांचा मृत्यू, तीन महिन्यांत ७३४ रुग्ण

8th Pay Commission : पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी, ८ व्या वेतन आयोगात मोठा बदल होणार?

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात नागपंचमी सण उत्साह साजरा

LPG KYC Deadline Extended: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC ची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या नवी तारीख

४६ व्या वर्षी २५ सारखा ग्लॅमरस लूक; 'ही' बॉलिवूड अभिनेत्री रोज करते फक्त १ काम, फिटनेस सीक्रेट समोर

SCROLL FOR NEXT