badlapur politics  Saam tv
मुंबई/पुणे

भाजपची ताकद वाढली; राऊतांचा शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश, बदलापुरातील राजकीय समीकरण बदललं

bjp Politics : बदलापुरात भाजपची ताकद वाढली आहे. शिंदे गटाच्या राऊतांनी शेकडो शिवसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

बदलापुरात शिंदे गटाला राजकीय धक्का

उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

प्रवीण राऊत यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली

आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापुरात शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने शेकडो शिवसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे उपशहरप्रमुख असलेले प्रवीण राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे गटाचे ३ नगरसेवकही भाजपसोबत असणार आहेत.

बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिंदेसेनेचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. महत्वाचं म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय. त्यामुळे पालिकेत भाजपची ताकद वाढलीय.आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

पंढरपुरात अजित पवार गटाला मोठा धक्का

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भीमा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपूरच्या पूर्वभागात खिंडार पडलं आहे. कल्याणराव‌ पाटील आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि यशवंत माने यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बदलापुरातील राजकारणात काय घडलं?

शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊतांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय.

प्रवीण राऊत यांना काय जबाबदारी मिळू शकते?

प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soya Chunks Bhaji Recipe : रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी सोयाबीनची चमचमीत भाजी घरी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Badam Burfi Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरीच्या घरी झटपट बनवा टेस्टी बदाम बर्फी

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आरोपी भरत भगत याला दोन दिवसांची पोलिस कोठडी

Metro Fight: मेट्रोत हाय वोल्टेज ड्रामा; दोन महिलांचा जागेवरुन वाद, झिंज्या उपटल्या अन्.. VIDEO व्हायरल

Maharashtra Politics: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT