राज्यात 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली. त्याचवेळी मतदान केलेल्या बोटावर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.
पुणे महापालिका
प्रभाग क्रमांक 34
धायरीतील नारायणराव सणस विद्यालयाबाहेर काही महिला आणि मुलांकडून बोगस मतदानासाठी बोटावरील शाई लिक्विडनं पुसली जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय..
पनवेल महापालिका
प्रभाग क्रमांक 7
दुसरीकडे पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये मनसे नेते योगेश चिले यांनीही डेमो दाखवत मार्करनं केली जाणारी शाई पुसल्याचा गंभीर आरोप केलाय...
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका क्षेत्रातही मतदारांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी केलाय..
छत्रपती संभाजीनगर
एकीकडे आयोगानं शाईऐवजी मार्कर वापरल्यानं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रानं उठवलयं... अशातच छत्रपती संभाजीनगरममध्ये सत्ताधारी पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निवडणुकीत पहिल्यांदाच शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केल्याचं सांगतीलंय... यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलीय...
दरम्यान मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जाते या आरोपावर साम टीव्हीनं पडताळणी केलीय.. नक्की वास्तव काय आहे पाहुयात फॅक्ट चेकमधून...
शाई पुसली जात असल्याचं चित्र समोर आलेल्यानं येनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा टोला ठाकरे बंधूंनी लगावलाय...
मात्र निवडणुक आयोगाकडून लावली जाणारी शाई पुसली जात नसल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलाय.. इतकचं काय तर शाईवर आक्षेप असेल तर ऑइल पेंट लावा, असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय..
मतदानाला एक दिवस शिल्लक असताना प्रचाराच्या वेळमर्यादेत झालेली वाढ, पाडू मशीनचा वापर आणि आता मार्कर पेन यामुळे निवडणुक आयोगाच्या पारदर्शकतेवर विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केला जातोय... निवडणुक आयोगानंही आरोपांना समाधानकारक उत्तर दिलेलं नाही... त्यामुळे विरोधकांच्या म्हण्याप्रमाणं आयोगावर खरचं कुणाचा दबाव आहे का? शाईऐवजी मार्कर पेन वापरून बोगस मतदारांना खुली सुट देण्याचा हा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. बोगस मतदारयाद्या ते मार्कर पेन हा निवडणुकीचा प्रवास पारदर्शक नक्कीच म्हणता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.