के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

india vs new zealand cricket news : के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ ठरली आहे. न्यूझीलंडने भारतावर मोठा विजय मिळवला आहे.
india vs new zealand cricket news
india vs new zealand Saam tv
Published On
Summary

राजकोटमध्ये न्यूझीलंडचा टीम इंडियावर मोठा विजय

न्यूझीलंडने ७ गडी राखून भारतावर विजय मिळवला

मिशेलची खेळी टीम इंडियाला पडली महागात

गुजरातच्या राजकोटमध्ये खेळलेल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर ७ विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला २८५ धावांचं आव्हान दिल होते. टीम इंडियाचं आव्हान न्यूझीलंडने ७ गडी राखून पार केलं. डेरिल मिशेलची खेळी टीम इंडियाला महागात पडली.

न्यूझीलंडसाठी डेरिल मिशेलने ११२ चेंडूत १३१ धावा कुटल्या. विल यंगने ८७ धावा कुटल्या. ग्लेन फिलिप्स ३२ धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये १-१ ने बरोबरी साधली आहे.

२८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. डेवोन कॉनवेला अवघ्या १६ धावांवर बाद करून न्यूझीलंडवर दबाव निर्माण केला. मात्र, डेरिल मिशेल आणि विल यंगच्या जोडीने टीम इंडियाला घाम फोडला.

india vs new zealand cricket news
साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी १५२ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली. यंगने ९८ चेंडूत ८७ धावा कुटल्या. तर या डावात डेरिल मिशेलने शतकी खेळी खेळली. त्याने वनडे करिअरमधील ८वे शतक ठोकलं.

india vs new zealand cricket news
बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

मिशेलने चौथ्या विकेटसाठी ग्लेन फिलिफ्सच्या साथीने ७८ धावांची भागीदारी रचली. न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत सीरीजमध्ये १-१ ने बरोबरी साधली. मिशेलने या डावात ११ चौकार आणि २ षटकार लगावले. तर फिलिप्सने २ चौकार आणि १ षटकाराच्या जोडीने ३२ धावा कुटल्या.

Q

भारत-न्यूझीलंड वनडे सामना कुठे खेळला गेला?

A

राजकोट येथील मैदानात हा सामना खेळवण्यात आला.

Q

न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या?

A

डेरिल मिशेल याने ११२ चेंडूत १३१ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com