Deputy CM Eknath Shinde Saam Tv News
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबईत शिंदेंच्या शिंवसेनेला खिंडार, बड्या नेत्यासह २० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Navi Mumbai Corporation Election 2026: नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान शिंदेसेनेला मोठा धक्का बसला. बड्या नेत्यासह २० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली. या सर्वांनी सामूहिक राजीनामे दिले.

Priya More

Summary -

  • नवी मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का

  • बड्या नेत्यासह २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले

  • पत्नीला उमेदवारी नाकारल्याने मिलिंद सूर्यराव नाराज

  • सानपाडा विभागातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर

नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली. या बड्या नेत्यासह २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. पत्नीला उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यराव नाराज होते. नाराज असलेल्या मिलिंद सूर्यराव यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीदरम्यान हा शिंदेच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये सानपाडामधून बायकोला उमेदवारी मिळावी यासाठी मिलिंद सूर्यराव हे प्रयत्न करत होते. पण पक्षाकडून त्यांच्या बायकोला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे ते नाराज झाले. शिवसेना शिंदे गटाकडून सोमनाथ वास्कर कुटुंबातील ३ जणांना उमेदवारी दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची तीव्र नाराजी सूर्यराव यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांच्या निष्ठावान कार्यानंतरही बायकोची उमेदवारी नाकारल्याने आपण व्यथित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मिलिंद सूर्यराव यांनी पुढील दोन दिवसांत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. सूर्यराव यांच्यासह २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेची साथ सोडली. त्यामुळे सानपाडा शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले असून सूर्यराव यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सानपाडा विभागातील २० पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. त्यापेक्षा अधिक राजीनामे दोन दिवसांमध्ये देण्यात येतील, असे देखील सूर्यराव यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT