Kulgaon Badlapur Politics News Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापूर स्वीकृत नगरसेवक प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजपच्या नव्या उमेदवारावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Kulgaon Badlapur Politics News : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना अडचणीत सापडल्या आहेत. आरोप–प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Alisha Khedekar

  • कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडणुकीवरून वाद

  • भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष अडचणीत

  • भाजपच्या मुस्लिम उमेदवार नियुक्तीमुळे राजकीय खळबळ

  • आरोप–प्रत्यारोपांमुळे बदलापूरचे राजकारण तापले

राज्यात महापालिका निवडणूकांची तयारी अंतिम टप्प्यात आल्या असून, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. ही निवडणूक दोन दिवसांपूर्वी पार पडली असली, तरी त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष अडचणीत सापडले आहेत. भाजपने मुस्लिम उमेदवार नगरसेवकासाठी पुढे केल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेकडून हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत असतानाच, भाजपने यापूर्वी तुषार आपटे यांना दिलेल्या स्वीकृत नगरसेवक पदावरून राज्यभर टीका झाली होती.हे प्रकरण ताजे असतानाच भाजपचे तुषार आपटे यांनी अवघ्या २४ तासांत राजीनामा दिला.

त्यानंतर भाजपाने मुस्लिम समाजातील शागोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शागोफ गोरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत मनसेचे राम जगताप यांनी त्यांच्यावर हिंदू–मुस्लिम दंगलीतील गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आहे. मात्र याबद्दल सध्या कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

यावर बोलताना गोरे यांनी हे आरोप फेटाळून लावत, ‘माझ्या आयुष्यात आजवर `एनसी्ही दाखल झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आमचे कुटुंब बदलापूर शहरात वास्तव्यास असून, आम्ही इकडचे वतनदार आहोत. महाराजांच्या विचारांनी चालणारे आमचे कुटुंब असून, बदलापूरमध्ये राहून हिंदू आणि मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी म्हटले. खोटे आरोप करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nath Designs: पारंपारिक मोत्याची नथ ते ऑक्सिडाईज्ड नथ, संक्रांतीनिमित्त या आहेत 5 लेटेस्ट नथ डिझाईन्स

Fresh Coconut Tips: फोडलेला नारळ रात्रीतच खराब होतो? मग 'ही' ट्रिक वापरा, खोबरं राहील फ्रेश

Maharashtra Live News Update : शहादा नगरपालिकेसाठी भाजपाच्या माधुरी मकरंद पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी

राज्यात मोठी खळबळ! तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांचा गेम होणार? कुणाला मिळणार संधी?

Ravindra Chavan : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं, रवींद्र चव्हाणांचा घणाघात

SCROLL FOR NEXT