congress news  Saam tv
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसचे निलंबित १२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार?

ambernath politics : अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना घडताहेत. निलंबित १२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

अंबरनाथमध्ये घडली मोठी राजकीय घडामोड

अंबरनाथमधील १२ नगरसेवकांचं निलंबन

काँग्रेस शहर अध्यक्षासह १२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

अजय दुधाणे, साम टीव्ही

राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना अंबरनाथ नगरपरिषदेत मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपशी युती केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून आज मंगळवारी या १२ नगरसेवकांचं निलंबन केलंय. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे १२ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अंबरनाथमधील काँग्रेस आणि भाजपच्या युतीचे महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. भाजपशी करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर वरिष्ठांनी मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर अंबरनाथचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अभद्र युतीनंतर काँग्रेसतर्फे 12 नगरसेवकांचे निलंबन होणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं?

भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने मिळून अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली. भाजप आणि काँग्रेस एकत्रित आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. अंबरनाथच्या प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं.

काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या १२ सदस्यांनी अंबरनाथ नगरपालिकेत भाजपासोबत परस्पर युती केली होती. भाजपासोबत युतीची घटना पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याने काँग्रेसची या सर्व सदस्यांविरोधात कारवाई केली. आता या 12 नगरसेवकांचे नगरसेवक बस जाते का राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या मंत्र्यांची बॅग तपासणी|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Prajaktaraj: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिले खास शिंदेशाही तोडे, PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT